• Download App
    Mumbai Municipal Corporation मुख्यमंत्री फडणवीस + उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मुंबई महापालिकेच्या ₹ 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा आढावा!!

    मुख्यमंत्री फडणवीस + उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मुंबई महापालिकेच्या ₹ 2 लाख कोटींच्या प्रकल्पांचा आढावा!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे आज मुंबई महानगरपालिकेच्या पायाभूत प्रकल्पांसंदर्भात आढावा बैठक झाली. बैठकीमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या सुमारे ₹1 लाख 41 हजार कोटींच्या तसेच प्रस्तावित ₹25 हजार कोटींच्या विविध पायाभूत व इतर सुविधा प्रकल्पांसंदर्भात तसेच महापालिकेच्या वतीने करण्यात येणार्‍या नाले सफाईच्या कामांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा (एआय) वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला दिले. Review of Mumbai Municipal Corporation’s projects worth ₹ 2 lakh crore

    धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्गाचे काम जवळपास पूर्ण होत आले असून या मार्गाच्या परिसरात हाजी अली येथे 1200 वाहन क्षमतेचे वाहन तळ उभारण्यात यावे, सध्या सुरू असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने कामे मार्गी लावावीत, प्रस्तावित प्रकल्पांसाठीची टेंडर कामे महिन्याभरात पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापालिका आयुक्त यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे विविध प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील प्रकल्पांसाठी निर्देश दिले

    सुमारे 700 किमी रस्त्यांचे काँक्रिटीकरण
    वर्सोवा ते भाईंदर सागरी किनारी मार्ग
    गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसह गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल, सायन पूल, बेलासिस पूल, महालक्ष्मी पूल, मढ-वर्सोवा पूल आदी पुलांची कामे
    दहीसर, पोईसर, ओशिवरा नदी पुनर्जीविकरण व मिठी नदी स्वच्छता प्रकल्प
    वर्सोवा, मालाड, भांडुप, घाटकोपर येथील मलजल उदचन केंद्र
    वर्सोवा मलजल बोगदा, मिठी नदी पॅकेज मलजल बोगदा व प्राधान्य मलजल बोगदा
    सायन केईएम, सायन व नायर रुग्णालयांचे पुनर्विकास व नवीन रुग्णालयांची उभारणी
    दहिसर पश्चिम द्रुतगती मार्गावरील ऑक्ट्रॉय नाका व मानखुर्द येथे वाहनतळ व व्यावसायिक केंद्र उभारणी
    निःक्षारीकरण प्रकल्प, मिठी नदी पॅकेज 5, पांजरापोळ जलशुद्धीकरण प्रकल्प, दहिसर उद्यान विकास, मानखुर्द वाहतूक केंद्र, जिजामाता उद्यान विस्तारीकरण व मुलुंड पक्षी संग्रहालय, देवनार बायोमायनिंग, देवनार पशुवध आधुनिकीकरण, मध्यवर्ती उद्यान पायाभूत सुविधा व गारगाई पाणी पुरवठा प्रकल्प हे सुमारे ₹25 हजार कोटींचे प्रकल्प

    बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव व संबंधित विभागाचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

    Review of Mumbai Municipal Corporation’s projects worth ₹ 2 lakh crore

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!