• Download App
    "स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्त्रोत सावरकर यांना मानाचा मुजरा"; राज्यमंत्री बच्चू कडू यांची भगूरच्या सावरकर स्मारकास भेट!! Respect to Savarkar, the source of inspiration for the freedom struggle

    “स्वातंत्र्य लढ्याचे प्रेरणास्त्रोत सावरकर यांना मानाचा मुजरा”; राज्यमंत्री बच्चू कडू यांची भगूरच्या सावरकर स्मारकास भेट!!

    प्रतिनिधी

    नाशिक : महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकार मधील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल भगूरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थान स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली तसेच स्मारकातील छायाचित्रे आस्थेने पाहिली.Respect to Savarkar, the source of inspiration for the freedom struggle

    सावरकर जन्मस्थान स्मारकाच्या वतीने मनोज कुवर यांनी बच्चू कडू आणि त्यांच्यासमवेत आलेल्या अन्य नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले. भगूरच्या नगराध्यक्षा अनिताताई करंजकर आणि भगुर नगर परिषदेचे सर्व नगरसेवकांनी भगूरवासीयांच्या वतीने बच्चू कडू यांचे स्वागत केले.

    या वेळी बच्चू कडू यांनी स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुर्तीस पुष्पहार अर्णन करुन अभिवादन केले. तसेच “स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्त्रोत रक्तरंजीत लढ्याचे सैनिक स्वातंत्र्यवीर सावरकरांना माझा मानाचा मुजरा” असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

    मनोज कुवर यांनी बच्चू कडू यांना सावरकर जन्मस्थान स्मारकाची सविस्तर माहिती दिली. तसेच “सहा सोनेरी पाने” हे स्वा. सावरकरांचे पुस्तक बच्चू कडू यांना
    भेट दिले. यावेळी नगराध्यक्षा अनिताताई करंजकर, प्रशांत लोया, संभाजी देशमुख, भगूरचे सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.

    Respect to Savarkar, the source of inspiration for the freedom struggle

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना