• Download App
    Gudi Padwa गुढी पाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेला नाशिककरांचा प्रचंड उत्साहात प्रतिसाद!!

    गुढी पाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेला नाशिककरांचा प्रचंड उत्साहात प्रतिसाद!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : मराठी नववर्षाच्या शुभारंभी गुढीपाडव्याच्या निमित्ताने नविन नाशिक परिसरात “नववर्ष स्वागत यात्रा” मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आयोजित करण्यात आली. गुरुवारी सकाळी ७.०० वाजता विविध भागांतून एकाच वेळी यात्रांचा प्रारंभ झाला. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत नववर्षाचे उत्साहात स्वागत केले.

    या यात्रेचा मुख्य उद्देश नववर्षाचे स्वागत करताना भारतीय संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, समाजात एकात्मता निर्माण करणे आणि सर्व समाजघटकांना एकत्र आणणे हा होता. यात्रेमध्ये शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, मंडळे, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

    पारंपरिक वेशभूषेत साकारलेले विविध देखावे या स्वागत यात्रेचे खास आकर्षण ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्ट प्रधानमंडळ, राम-लक्ष्मण-सीता माता, खंडोबा महाराज तसेच लहान मुलांनी श्रीकृष्ण-राधा यांच्या वेशात सहभाग घेतला होता, ज्यामुळे वातावरण भक्तिमय आणि संस्कृतीमय झाले.

    विशेष म्हणजे विविध हास्य क्लबच्या सदस्यांनीही यात्रेत सहभाग घेत सकारात्मकता, आनंद आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे यात्रेला एक वेगळाच उत्साही आणि आनंददायी माहोल लाभला.



    खुटवड नगर, पवन नगर, मटाले चौक, आदर्श नगर आणि वनश्री नगर आदी भागांतून सुरू झालेल्या सर्व यात्रा माऊली लॉन्स, डी.जी.पी. नगर-२, कामटवाडे येथे एकत्र येऊन समारोप करण्यात आला. समारोप प्रसंगी २१ लकी ड्रॉ काढून पैठणी आणि नेकलेस, नथ, रिलायंस ज्वेलस कंपनीने दिलेले बक्षिसे देण्यात आले.

    या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती श्री. हेमंत राठी उपस्थित होते. उपमहापौर विलास अण्णा शिंदे, महेश हिरे, नगरसेविका प्रतिभा पवार, कविता नाईक, सुवर्णा मटाले, नगरसेवक शरद फडोळ, दिलिप देवांग, या वर्षीचे अध्यक्ष सुनील कोटगी, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, सचिव राजेश मालपुरे, कोषाध्यक्ष योगेश मांडे, शरद जाधव, अनिल चांदवडकर, श्रीवर्धन मालपुरे, तुषार चव्हाण, महेंद्र थोरात, प्रतिभा गोसावी, मोनीष मराठे, अभिषेक धामणे, ओंकार जगताप आदी सहभागी झाले.

    सन मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कलाकार शीतल क्षीरसागर, अशोक फलदेसाई आणि अनुष्का गीते यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे आकर्षण ठरली.

    नववर्ष स्वागत यात्रा समिती (नवीन नाशिक परिसर) यांच्या वतीने आयोजित या यात्रेत नागरिकांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभाग घेत आनंद, एकात्मता आणि संस्कृतीचा अभिमान व्यक्त केला.

    Residents of Nashik respond with immense enthusiasm to the Gudi Padwa New Year Welcome Procession!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे दोन आठवड्यांपासूनच लक्ष; पुरावे गोळा करूनच केली धडक कारवाई!!

    वंचित बहुजन आघाडीने निषेध केला “एपस्टीन मोदींचा”; पण फोटो चिकटवला आईन्स्टाईनच्या हेअर स्टाईल मधल्या मोदींचा!!

    राज ठाकरेंची आज शिवतीर्थावर गर्जना; उद्धव सेनेशी युतीनंतरचा पहिला गुढीपाडवा मेळावा; मोठ्या घोषणेची अपेक्षा!!