• Download App
    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टमधील नाणे संकट केले दूर Reserve Bank of India resolves coin crisis at Saibaba Sansthan Trust in Shirdi

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शिर्डीतील साईबाबा संस्थान ट्रस्टमधील नाणे संकट केले दूर

    आरबीआयाने समस्येवर तोडगा काढल्याने साईबाबा संस्थान आणि शिर्डीतील बँकांना दिलासा मिळाला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : शिर्डी साई मंदिरातील दानपेटीत जमा होणाऱ्या भरमसाठ नाण्यांच्या प्रश्नावार अखेर रिझर्व्ह बँकेने तोडगा काढला आहे. नाण्यांचा तुटवडा असणाऱ्या अन्य बँकांकडे ही नाणी जमा केली जाणार आहेत. अखेर या समस्येवर आरबीआयाने तोडगा काढल्याने साईबाबा संस्थांसह शिर्डीतील बँकांना मोठा दिलासा मिळाला आहे. Reserve Bank of India resolves coin crisis at Saibaba Sansthan Trust in Shirdi

    साईबाबांच्या दानपेटीत वर्षभरात कोट्यवधींची नाणी जमा होतात. शिर्डीतील प्रत्येक बँकेतही कोट्यवधींची नाणी साचली आहेत. परिणामी नाणी स्वीकारणं बँकांना कठीण झालं होतं. काही बँकांनी तर संस्थांच्या ठेवी स्वीकारण्यासच असमर्थता दर्शवली होती. विशेष म्हणजे ट्रस्टची विविध सरकारी बँकांच्या १३ शाखांमध्ये खाती आहेत.

    अशा परिस्थितीत २६ एप्रिल रोजी नवी मुंबईतील आरबीआयच्या बेलापूर कार्यालयातील एका अधिकाऱ्याने ट्रस्टसोबत बैठक घेतली. यामध्ये देणगीचे पैसे जमा झालेल्या १३ बँकांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.  या बैठकीत आरबीआयच्या अधिकाऱ्याने शिर्डीतील राष्ट्रीयकृ बँकेत पडून असलेली कोट्यवधींची नाणी तत्काळ  अहमदनगर किंवा शेजारील जिल्ह्यांतील ज्या बँकेत नाण्याचा तुटवडा आहे, त्यांच्याकडे जमा करण्याची सूचना केली. यामुळे शिर्डीतील बँकांवरील नाण्यांचा बोजा कमी होणार आहे आणि बँकांमध्ये जागाही रिकामी होणार असल्याने, त्या बँकांनी आता साई संस्थानची दान रक्कम स्वीकारण्यास तयारी दर्शवली आहे. अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव दिली आहे.

    Reserve Bank of India resolves coin crisis at Saibaba Sansthan Trust in Shirdi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी

    Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंकडून प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध; दीपक काटेच्या कृत्याला पाठिंबा नाही

    Shinde Shiv Sena : एकनाथ शिंदे यांना आनंदराज आंबेडकरांची साथ; पत्रकार परिषदेत युतीची अधिकृत घोषणा