• Download App
    Devendra Fadnavis ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुन्हा ग्वाही

    ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पुन्हा ग्वाही

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही, मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे, त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केली. ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही दिली. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची 234 वी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी देवेंद्र फडणवीसांनी हे वक्तव्य केले.

    मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आदळ आपट करणाऱ्या विरोधकांना देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

    मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही, ओबीसींच्या ताटातील काढून घेऊन सरसकट प्रमाणपत्र देणार नाही. काहीही झाले तर ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. ओबीसींकरता योजना करणारे हे सरकार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    ज्यांच्याकडे नोंदी, त्यांनाच प्रमाणपत्र

    देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या सरकारची नीती पक्की आहे. एकाचे काढून दुसऱ्याला द्यायचे नाही. इंग्रजांनी जे केलं, ते आम्ही करणार नाही. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मराठावाड्यात 1948 पर्यंत इंग्रज राज्य नव्हते, तर निजाम राज्य होते. मराठवाड्याचे रेकॉर्ड हैदराबाद गॅझेटमध्ये होते. आता ज्यांच्याकडे नोंद असेल त्याला प्रमाणपत्र दिले जाईल असे आपण सांगितले आहे.

    ओबीसी समाजाच्या मागण्या पूर्ण करू

    देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, ओबीसींना जोपर्यंत मुख्य प्रवाहात आणणार नाही त्यावर त्याचा विकास होणार नाही. ओबीसी विकास होईपर्यंत शिवकार्य पूर्ण होऊ शकत नाही. कोणीही मनात शंका घेऊ नका.

    – देवेंद्र फडणवीस म्हणाले :

    उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा करतो. दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या रामोशी समाजाचा संबंध हा प्रत्यक्ष श्रीराम याच्याशी आहे. रामोशी समाजाच्या राजाचे कार्य अतुलनीय आहे. शिवाजी महाराज याच्या स्वराज्यामध्ये बहिर्जी नाईक रामोशी हे महाराजाचा विश्वासू होते, गुप्तहेर होते. बहिर्जी नाईक हे तिसरा डोळा म्हणून काम करत होते.

    देव देश धर्माच्या लढ्यात हा रामोशी समाज अग्रेसर होता. ब्रिटिशांना पहिला विरोध राजे उमाजी नाईक यांनी केला. त्यांनी सेना तयार करून इंग्रजांना पळवले. रॉबर्ट यांनी पत्र लिहिले का उमाजी नाईक शिवाजी महाराज झाले असते. उमाजी नाईक हे उत्तम प्रशासक होते, स्वतःच्या हाताने त्यांनी पत्र लिहिले आहेत.

    उमाजी नाईक सापडले नसते पण फितुरी झाली. शुभराजे पण असेच पकडले गेले. राजे उमाजी नाईक यांना पकडून इंग्रजांनी फाशी दिली. पण समाजाची लढाई थांबली नाही. इंग्रजांनी गुन्हेगारी कायदा करून समाजाला गुन्हेगार ठरवले. यांना नाही दाबले तर राज्य करता येणार नाही हे माहिती होते. पण इतिहासाने या समाजाचा इतिहास कधीच पुढे येऊ दिला नाही,.

    जवळपास 80 वर्षे गुन्हेगारी म्हणून समाज मागे गेला, त्यांचा विकास नाही झाला. आता सरकारचा प्रयत्न आहे की त्यांना त्यांचा विकास शौर्य आठवण करून द्यायचा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे.

    हा कार्यकम जयंती पुरता नाही, तुम्ही कोण आहे लक्षात आले पाहिजे. आता मागे राहता कामा नये. आता पुढे गेले पाहिजे. समाज पाठीमागे राहणार नाही यासाठी राजे उमाजी नाईक महामंडळ स्थापन केले. त्यामाध्यमातून 15 लाखांपर्यंत कर्ज द्या, दोन लाखांपर्यंत बिगर तारण कर्ज देण्यात येईल. हा समाज नोकरी देणारा झाला पाहिजे. महाज्योतीमधून स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

    Reservation for Marathas without disrupting OBC reservation; Chief Minister Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vadettiwar : काॅंग्रेसकडून आरक्षणाच्या प्रश्नाला राजकीय रंग, वडेट्टीवार यांचा नागपुरात ऑक्टोबरमध्ये ओबीसींचा महामोर्चा काढण्याचा इशारा

    Sanjay Raut on Raj Thackeray : दसरा मेळाव्यातील राज ठाकरेंच्या उपस्थितीवर संजय राऊतांची फुली !

    Laxman Hake : बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याची अजित पवारांची लायकी नाही ; लक्ष्मण हाकेंची टीका