प्रतिनिधी
नाशिक : रा.स्व. संघ पश्चिम क्षेत्र द्वितीय (विशेष) वर्ष संघ शिक्षा वर्गाचा आरंभ भोसला मिलिटरी प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात दिनांक १५ मे सोमवारी झाला.Res. self Sangh’s West Region Special Second Year Shiksha Class Starts in Nashik; Over five hundred volunteers participated
या प्रशिक्षण वर्गात श्री. जितेंद्र भाई भिंडी (जुनागढ , गुजरात) वर्ग अधिकारी म्हणून पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत, त्यांच्या हस्ते भारतमाता पूजन करून वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
श्री. हसमुखभाई पटेल वर्ग पालक अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच, श्री. अनिल जोशी पश्चिम क्षेत्र बौध्दिक प्रमुख व
श्री. सुनील देसाई पश्चिम क्षेत्र शारीरिक प्रमुख उपस्थित आहेत.
श्री. नरेश कर्पे (वर्ग कार्यवाह)
श्री. हरेश पंचाल (वर्ग मुख्यशिक्षक)
श्री. सुनिल नरगुंद (वर्ग व्यवस्था प्रमुख)
श्री. नरेश अहिरे, नंदकिशोर चंद्रात्रे (सह व्यवस्था प्रमुख) म्हणून काम बघणार आहेत.
या विशेष शिक्षा वर्गात ४० ते ६५ वयोगटातील स्वयंसेवक सहभागी आहेत. शासकीय दृष्टीने महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा हे ३ राज्य मिळून बनलेल्या संघाच्या पश्चिम क्षेत्रातील देवगिरी , विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, सौराष्ट्र, गुजरात अशा सहा प्रांता मधून एकूण ४७६ शिक्षार्थी सहभागी झाले आहेत.
वर्गाचे संचालन ५ अधिकारी ३३ शिक्षक, ७ प्रांत प्रमुख करणार असून या वर्गात शारीरिक, बौद्धिक, सेवा, प्रचार, संपर्क विषयक प्रशिक्षण दिले जाणार आहे. नाशिक शहरातील ८० स्वयंसेवक निवास, भोजन, स्वच्छ्ता, रुग्णालय, वाहतूक इत्यादी व्यवस्था सांभाळणार आहेत.
Res. self Sangh’s West Region Special Second Year Shiksha Class Starts in Nashik; Over five hundred volunteers participated
महत्वाच्या बातम्या
- सरकार विरोधात पोलीस – प्रशासनाला चिथावणी देणे संजय राऊतांना भोवले; राऊतांविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल
- परीक्षेची संधी : एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारचा दिलासा; डाॅ. भारती पवारांची ग्वाही
- Jammu-Kashmir : टेररफंडिंग प्रकरणी ‘NIA’ची पुलवामासह सहा ठिकाणी छापेमारी!
- मुंबईतील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही