प्रतिनिधी
नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूर गावातील सावरकर वाड्यामध्ये आज भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. Republic Day is celebrated with enthusiasm at Savarkar Wada in Bhagur
यावेळी सेवानिवृत्त सरकारी अधिकारी बाळासाहेब गायधनी यांनी ध्वजावतरण केले, तर सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वाड्यातील दालनात सावरकरांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.
सावरकर स्मारकाच्यावतीने बाळासाहेब गायधनी, डॉ. प्रतिभा पाटील, अॅड. संजय पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भगूरकर नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावरकर स्मारकाचे व्यवस्थापक मनोज बंडू कुंवर आणि भूषण कापसे यांनी संयोजन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बुरके यांनी केले.