• Download App
    पीक नुकसानीची माहिती ऑफलाईन द्या ; अस्मानी संकटानंतर शेतकरी पीकविमा कंपन्यांच्या नियमामुळे झाले त्रस्तReport crop loss offline; After the catastrophic crisis, farmers suffered due to the rules of crop insurance companies

    पीक नुकसानीची माहिती ऑफलाईन द्या ; अस्मानी संकटानंतर शेतकरी पीकविमा कंपन्यांच्या नियमामुळे झाले त्रस्त

    पीकविमा कंपनीने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ऑफलाईन तक्रार दाखल केली तरच पाहणी करून विमा देण्याची भूमिका घेतली आहे.Report crop loss offline; After the catastrophic crisis, farmers suffered due to the rules of crop insurance companies


    विशेष प्रतिनिधी

    बीड : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप नुकसान झालं आहे. यादरम्यान पीकविमा कंपनीने अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ऑफलाईन तक्रार दाखल केली तरच पाहणी करून विमा देण्याची भूमिका घेतली आहे.

    केज तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात उभे असलेले पीक काढणीच्या वेळी शेतातील पिकासह मातीही वाहून गेली आहे. नुकसानीची तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांना ऑफलाईन माहिती दिल्यानंतर नुकसानीची पाहणी करून विमा देण्याचा पवित्रा विमा कंपनीने घेतल्याने अस्मानी संकट कोसळल्याने शेतकऱ्यांसमोर सावरण्यापूर्वीच दुसर अजून एक संकट उभे राहिले आहे.



    शेतकऱ्यांची तालुका कृषी कार्यालयात मोठी गर्दी

    शेतातील कामे सोडून शेतातील नुकसानीची माहिती ऑफ लाईन फॉर्म भरून विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे देण्यासाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात मोठी गर्दी केली. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी संतप्त होत विमा कंपनीला विमा द्यायचा नसल्याने अशा प्रकारे शेतकऱ्यावर सुड उगवत असल्याचा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

    विमा कंपनीकडे विमा भरताना सर्व माहिती दिलेली असतानाही पुन्हा माहिती मागून शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार विमा कंपनी करत आहेत. – लक्ष्मीकांत लाड, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

    Report crop loss offline; After the catastrophic crisis, farmers suffered due to the rules of crop insurance companies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार