• Download App
    रिझर्व्ह बँकेकडून रेपो, रिव्हर्स रेपो दर कायम, जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के राहणार|Repo and reverse repo rates will remains same

    रिझर्व्ह बँकेकडून रेपो, रिव्हर्स रेपो दर कायम, जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के राहणार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – वाढती महागाई आणि चलनवाढ लक्षात घेऊन भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो रेट चार टक्क्यांवर तसेच रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर ९.५ टक्के; तर चलनवाढीचा दर ५.७ टक्के राहण्याचा अंदाजही रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला आहे.Repo and reverse repo rates will remains same

    रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, कोरोनाची दुसरी लाट थंडावत असताना देशातील आर्थिक व्यवहार सुरू झाले असून अर्थव्यवस्था सावरू लागली आहे.



    वर्ष २०२१-२२ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नवाढ ९.५ टक्के राहील, हा अंदाज कायम ठेवण्यात आला आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २१.४ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ७.३ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ६.३ टक्के व चौथ्या तिमाहीत ६.१ टक्के अशी जीडीपीमध्ये वाढ होण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे;

    तर पुढील आर्थिक वर्षाच्या (२०२२-२३) पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२२) हा दर १७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे. ग्राहकांच्या क्रयशक्तीवर आधारित चलनफुगवट्याचा दर या आर्थिक वर्षात ५.७ टक्के राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला.

    Repo and reverse repo rates will remains same

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना