• Download App
    कृषी कायदे रद्द; हे फक्त शेतकरी आंदोलकांचे यश, विरोधी पक्षांचे नव्हे; अण्णा हजारे यांचा टोला|Repeal of agricultural laws; This is not just the success of the peasant agitators, but of the opposition; Anna Hazare's Tola

    कृषी कायदे रद्द; हे फक्त शेतकरी आंदोलकांचे यश, विरोधी पक्षांचे नव्हे; अण्णा हजारे यांचा टोला

    प्रतिनिधी

    अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा गुरुनानक जयंती प्रकाश पर्व याचे निमित्त साधत तीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी समाधान व्यक्त केले असून हे फक्त शेतकरी आंदोलकांचे यश आहे. विरोधकांचे नाही, असा टोला विरोधी पक्षांना लगावला आहे.Repeal of agricultural laws; This is not just the success of the peasant agitators, but of the opposition; Anna Hazare’s Tola

    शेतकरी आंदोलन सुरू असताना आंदोलकांचे काही प्रतिनिधी राळेगणसिद्धी येथे येऊन अण्णा हजारे यांना भेटले होते. त्यांना दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याची विनंती केली होती. परंतु, अण्णा हजारे यांनी काही कारणाने दिल्लीला येता येत नाही असे सांगून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये त्यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण देखील केले होते.



    आज जेव्हा कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली त्याचे अण्णा हजारे यांनी स्वागत केले आहे. मात्र हे संपूर्ण यश फक्त शेतकरी आंदोलकांचे आहे. विरोधी पक्षांचा याच्याशी काहीही संबंध नाही, अशा स्पष्ट शब्दांत अण्णा हजारे यांनी देशातल्या सर्व विरोधी पक्षांना टोला हाणला आहे. विरोधी पक्ष शेतकरी आंदोलकांना अजूनही आंदोलन करण्यासाठी उकसवत असल्याबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केले.

    Repeal of agricultural laws; This is not just the success of the peasant agitators, but of the opposition; Anna Hazare’s Tola

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!