• Download App
    दहावी बारावी परीक्षा काळात ध्वनिप्रदूषण रोखा, मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा; सुराज्य अभियानाची मागणीRemove loudspeakers of masques, demands surajya abhiyan

    दहावी बारावी परीक्षा काळात ध्वनिप्रदूषण रोखा, मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा; सुराज्य अभियानाची मागणी

    प्रतिनिधी

    मुंबई : सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षा काळ चालू आहे. विद्यार्थी परीक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसांतून पाच वेळा वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यांमुळे, तसेच अन्य काही लोकांच्या ध्वनिप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. भल्या पहाटेपासूनच रात्रीपर्यंत कर्कश्श आवाजात भोंगे वाजतात. त्यामुळे सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाने केली आहे. या संदर्भातील निवेदन महाराष्ट्राच्या गृहमंत्री कार्यालयाला पाठविले आहे. Remove loudspeakers of masques, demands surajya abhiyan

    काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी मशिदींवरील भोंग्यांतून होणार्‍या ध्वनिप्रदूषणाविषयी जोरदार आवाज उठवला होता; मात्र तत्कालीन ठाकरे – पवार सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी जाणीवपूर्वक टाळली होती. आता केंद्रात आणि राज्यात सर्व समाजघटकांचे हित पहाणारे शासन सत्तेत आले आहे. त्यामुळे शासनाने या संदर्भात तातडीने ध्वनिप्रदूषण करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, असे सुराज्य अभियानाचे समन्वयक डॉ. उदय धुरी यांनी निवेदनात म्हटले आहे.


    राज ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध!!


     

    प्रत्येक मशिदीत दिवसातून पाच वेळा भोंगे वाजतात. एका भोंग्यातून कमीतकमी 120 डेसिबल इतका मोठा आवाज येतो. ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक कायद्यानुसार 75 डेसिबल ही औद्योगिक क्षेत्रासाठीची कमाल मर्यादा आहे. निवासी भागांत तर ती 55 डेसिबल इतकीच मर्यादा आहे. त्यामुळे अशा भोग्यांना कायद्यानुसार अनुमती मिळू शकत नाही. असे एक नव्हे, तर प्रत्येक मशिदीवर किमान 4, 8 वा 12 भोंगे लावलेले असतात. यांतून किती ध्वनिप्रदूषण होत असेल, याची कल्पना करता येईल.

    त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यात आणि शांत झोप मिळण्यात अडचणी येत आहेत. या समस्येकडे एक गंभीर सामाजिक समस्या म्हणून पाहायला हवे. प्रथम किमान परीक्षा काळात तरी भोंगे बंद करायला हवेत. त्यानंतर अनधिकृतपणे आणि ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ओलांडणार्‍या सर्वच मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करायला हवी, अशी मागणीही या निवेदनात केली आहे.

    Remove loudspeakers of mosques, demands surajya abhiyan

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!