वृत्तसंस्था
पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. त्या मध्ये एका नामांकित हॉस्पिटलच्या नर्सचाही समावेश आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन चढ्या किमतीत विकताना ही कारवाई करण्यात आली. पृथ्वीराज मुळीक आणि नर्स नीलिमा घोडेकर यांना पोलिसांनी अटक केली. Remdesivir Injection black market is bursted in pune city ; two persons arrested by police.
गुन्हे शाखेच्या पथकाला भारती विद्यापीठ परिसरात एक जण रेमडेसिवीर इंजेक्शन अधिक किमतीत विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून अधिक किमती इंजेक्शन देताना पृथ्वीराज मुळीक याला अटक केली.
चौकशीत त्याने हे इंजेक्शन त्याची मैत्रीण नीलिमा घोडेकर हिच्याकडून घेतल्याचे सांगितले. नीलिमा ही वाकड येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
काळाबाजार रोखण्यासाठी संपर्क साधा
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत पोलिसांची दहा विशेष पथके नेमली आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार होत असल्याची माहिती नागरिकांनी द्यावी,असे आवाहन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले.
Remdesivir Injection black market is bursted in pune city ; two persons arrested by police.
महत्त्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या निर्यातीवर भारताने घातली बंदी, कंपन्यांनाही उत्पादन वाढवण्याचे निर्देश
- राहुल गांधी म्हणाले – सरकारने CBSE परीक्षा घेण्याबाबत फेरविचार करावा, प्रियांका गांधींचे शिक्षणमंत्र्यांना पत्र
- अवघ्या काही दिवसांत शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल, गॉल ब्लॅडरवर होणार शस्त्रक्रिया
- महाराष्ट्राने ओलांडला १ कोटी लसीकरणाचा टप्पा : आरोप- प्रत्यारोपांच्या धुळवडीतही केंद्र व राज्यात सहकार्य अबाधित!
- लशीकरणाचा विक्रम: ८५ दिवसांत १० कोटींपेक्षा जास्त लोकांना लस; अमेरिका, ब्रिटन आणि चीनलाही टाकले मागे