• Download App
    रिलायन्स जिओ आता मुंबई, चेन्नई, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरला एक्स्प्रेस कनेक्टिव्हिटीने जोडणार।Reliance jio connecting world with submarine system

    रिलायन्स जिओ आता मुंबई, चेन्नई, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरला एक्स्प्रेस कनेक्टिव्हिटीने जोडणार

    वृत्तसंस्था

    मुंबई : जगभर दबदबा असलेली रिलायन्स जिओ आता आंतरराष्ट्रीय सबमरीन केबल सिस्टम बनवित आहे. रिलायन्स जिओ पुढील पिढीच्या दोन सबमरीन केबल टाकत आहे. हे भारत आणि संपूर्ण भारतीय क्षेत्राच्या डेटा गरजा लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. जिओने यासाठी जागतिक दर्जाचे सबमरीन केबल सप्लायर सबकॉमशी करार केला आहे. Reliance jio connecting world with submarine system

    ही वेगवान प्रणाली सुमारे १६,००० किमी अंतरासाठी २०० TBPS पेक्षा अधिक क्षमता प्रदान करेल. आयएएक्स केबल सिस्टम जगातील वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारताला आशिया पॅसिफिकच्या बाजारपेठेशी जोडेल ज्यामुळे मुंबई, चेन्नई, थायलंड, मलेशिया आणि सिंगापूरला एक्स्प्रेस कनेक्टिव्हिटी ने जोडता येईल.



    इंडिया-एशिया-एक्सप्रेस (आयएएक्स) प्रणाली भारत पूर्वेकडून सिंगापूर आणि त्यापलीकडे जोडेल, तर भारत-युरोप-एक्सप्रेस (आयएक्स) प्रणाली भारत मध्य-पूर्वेला आणि पश्चिमेला युरोपला जोडेल. आयएएक्स आणि आयएक्स भारत आणि भारताबाहेर डेटा आणि क्लाउड सेवा वितरित करण्याची क्षमता वाढवतील. २०१६ मध्ये जिओ लाँच झाल्यापासून, डेटा आकडेवारीत भरभराट झाली आहे. डेटा वापराच्या वाढीमुळे भारत आज आंतरराष्ट्रीय डेटा नेटवर्क नकाशावर उदयास आला आहे.

    Reliance jio connecting world with submarine system

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister : गुंजवणी सिंचन प्रकल्पाच्या कामाला गती द्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश

    Bombay Stock : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारत उडवून देण्याची धमकी, चार आरडीएक्स बाँब ठेवल्याचा मेल

    जयंत पाटलांचा “अडथळा” सरताच पवारांच्या घरातच पदांची वाटणी; मुख्य सचिव पदी रोहित पवारांची वर्णी; अख्खी राष्ट्रवादी पवार कुटुंबाच्या सावटाखाली!!