वृत्तसंस्था
मुंबई : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) आज दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी कंपनीच्या या 45व्या एजीएमला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील. आरआयएलच्या गुंतवणूकदारांसोबतच कॉर्पोरेट जगता आणि शेअर बाजाराच्या नजराही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमकडे लागल्या आहेत.Reliance AGM 2022 Reliance’s AGM today, 5G launch to Jio’s IPO, Mukesh Ambani’s announcements all eyes on the world
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमकडून काय अपेक्षा आहेत
दरवर्षी RIL च्या AGM मध्ये अशा काही योजना किंवा व्यवसायाच्या घोषणा केल्या जातात, ज्याची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत असतात. या वर्षीची एजीएम खूप खास असणार आहे कारण रिलायन्स जिओ बहुप्रतिक्षित 5G लाँच करण्यासाठी कोणती तारीख आणि टाइमलाइन सेट करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच कंपनीच्या पुढील बिझनेस प्लॅनच्या घोषणेमध्ये कोणती मोठी घोषणा होईल, याची प्रतीक्षा आहे. याशिवाय रिलायन्स जिओ, रिलायन्स रिटेलच्या आयपीओबाबत काय निर्णय घेण्यात आला आहे, हे कळू शकते. तसेच, मुकेश अंबानी आपल्या व्यवसायाचा वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्यासंबंधी काही घोषणा करतात का? त्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे.
या वर्षी एजीएमचे प्रसारणही विशेष पद्धतीने केले जाणार आहे
रिलायन्स इंडस्ट्रीजची ही एजीएम अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तसेच व्हर्च्युअल रिअॅलिटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित केली जाईल. यामध्ये, ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, मिक्स्ड रिअॅलिटी आणि अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही विस्तारित वास्तवाच्या छत्राखाली एजीएम पाहू शकाल.
कुठे पाहता येईल रिलायन्स इंडस्ट्रीजची एजीएम?
कंपनीच्या डायरेक्ट मीटिंग लिंक व्यतिरिक्त, तुम्ही Twitter, Facebook, Ku, Jio Meet आणि YouTube द्वारे देखील पाहू शकाल. तुम्ही ट्विटरवर @flameoftruth ला भेट देऊन रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एजीएमचे लाइव्ह व्हिडिओ आणि अपडेट पाहू शकता. कूवर जाऊन बघायचे असेल तर https://www.kooapp.com/profile/RelianceUpdates वर क्लिक करून ते पाहू शकता.
व्हॉट्सअॅपवरही मिळेल अपडेट
तुम्ही रिलायन्सच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोल्यूशन जिओ मीटला भेट देऊन मीटिंग पाहू शकता. या व्यतिरिक्त, कंपनीने यावर्षी एक व्हॉट्सअॅप नंबर देखील जारी केला आहे जिथे तुम्हाला त्याच्या एजीएमचे सर्व अपडेट मिळू शकतात. AGM ची Jio Meet लिंक या नंबरवर मिळू शकते- हा नंबर आहे- 7977111111. तुम्हाला फक्त या नंबरवर जावे लागेल आणि हाय लिहावे लागेल – या चॅटबॉटवर तुम्हाला रिलायन्स एजीएम कशी पहायची याबद्दल सर्व माहिती मिळेल.
Reliance AGM 2022 Reliance’s AGM today, 5G launch to Jio’s IPO, Mukesh Ambani’s announcements all eyes on the world
महत्वाच्या बातम्या
- शिंदेसेनेने बदलला पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचा पत्ता : यशवंत जाधवांची पक्षाचे मुंबई अध्यक्ष, नवा पत्ता ठाण्याचा
- सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी : 5 न्यायाधीशांचे घटनापीठ घेणार निर्णय
- काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक १७ ऑक्टोबरला, गरज भासल्यास १९ ला मतमोजणी आणि निकाल
- Sonali Phogat : सोनाली फोगट हत्येप्रकरणी पाचवी अटक, हे चारही आरोपी आधीच पोलिसांच्या ताब्यात