विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या आमदारांनी उपाध्यक्षांच्या दालनात कोणतेही अपशब्द वापरलेले नाही, माझं तर खुले आव्हान आहे गैरप्रकार झाला असेल तर त्याचे CCTV फुटेज जाहीर करा दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल, असे भाजपचे संजय कुटे यांनी सांगितले. Release CCTV footage: Sanjay Kute Challenge the government after the suspension action
तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की अन् शिवीगाळ प्रकरणी भाजपाच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्या पार्श्व भूमीवर ते बोलत होते.
कुटे म्हणाले, खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे हे आता बंद करा.तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सूडबुद्धीने भाजपच्या १२ सदस्यांचे निलंबन केले आहे. पण, भाजपचे आमदारांचा ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा लढा हा सुरूच राहणार आहे.
ओबीसी आरक्षणासाठी १२ नव्हे तर भाजपच्या संपूर्ण १०६ आमदारांना निलंबित केले तरी आम्ही मागे हटणार नाही, ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा लढा सुरूच राहणार.
ठरवामध्ये बऱ्याच गोष्टी या मंत्री भुजबळ यांनी चुकीच्या मांडल्या, ओबीसी आरक्षण हे मिळूच द्यायचे नाही हे षडयंत्र या महावसुली सरकारचे आहे , लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा हाच अजेंडा या सरकारचा आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना जे आमदार वाचा फोडायचा प्रयत्न करतील त्यांची सभागृहात मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे, असा आरोप कुटे यांनी केला.