• Download App
    Economic Development! सायबर सुरक्षा ते ड्रग्स विरोधात झिरो टॉलरन्स; महाराष्ट्र पोलीस सुधारणांचा नवा अध्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

    सायबर सुरक्षा ते ड्रग्स विरोधात झिरो टॉलरन्स; महाराष्ट्र पोलीस सुधारणांचा नवा अध्याय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : सायबर सुरक्षा ते ड्रग्स विरोधात झिरो टॉलरन्स अशा प्रकारे महाराष्ट्र पोलिसांनी सुधारणांचा नवा अध्याय लिहिलाय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते मुंबई येथे ‘इंडियन पोलीस फाऊंडेशन (IPF) वार्षिक दिवस 2025’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जगात कोणतीही महासत्ता ही कायदा सुव्यवस्थेविना उभी राहू शकत नाही आणि उभी राहिली तरी टिकू शकत नाही.

    संविधानात पोलीस व्यवस्थेत चेक अँड बॅलन्सची तरतूद असून अनेक अधिकाऱ्यांनी उपलब्ध कायद्यांचा वापर करून परिवर्तनशील सुधारणा केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले. त्यांनी स्पष्ट केले की, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस यांनी आपल्या उच्च मानकांद्वारे नेहमीच सकारात्मक ओळख निर्माण केली असून, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे देशातील पोलीस दलांमध्ये वेगळे स्थान मिळवले आहे.

    यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले:

    – पोलीस व्यवस्थेत नाविन्यपूर्ण सुधारणा – महाराष्ट्रात 53 वर्षांनी पोलीस आकृतीबंध तयार.

    – देशातील सर्वात प्रगत सायबर सिक्युरिटी सेंटर महाराष्ट्रात उभारले; याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता.

    – AI चा वापर करून गुंतागुंतीची प्रकरणे सोडवण्यास सुरुवात.

    – ड्रग्स विरोधातील लढाईत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण – ड्रग्सच्या व्यवहारांमध्ये लिप्त आढळलेल्या पोलिसांची थेट बडतर्फी.

    – नवीन फौजदारी कायदे नागरिकांमध्ये कायद्यावरील विश्वास व न्यायव्यवस्थेबद्दल सकारात्मकता निर्माण करतील.

    गुन्ह्यांची जलद उकल करण्यास मदत व्हावी यासाठी अत्याधुनिक सायबर सिक्युरिटी लॅब उभारण्यात आली आहे. इतर देशांनीही आपल्या राज्यासारखी लॅब बनविण्याची मागणी केली आहे.

    याप्रसंगी उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री असीम अरुण, आयपीएफचे चेअरमन आणि मेघालयचे माजी राज्यपाल आर. एस. मूशाहारी, आयपीएफचे प्रेसिडंट आणि सीईओ ओ. पी. सिंह, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    Reimagining The Police For India’s Economic Development!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाणे, ओरोस, कुळगाव – बदलापूर मध्ये म्हाडाची दिवाळी भेट; 5,354 घरे आणि 77 भूखंडाची संगणकीय सोडत

    Yogesh Kadam,:गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले- माझी इमेज डॅमेज करण्याचे प्रयत्न, माझ्या बदनामीसाठी खासगी आयुष्यात ढवळाढवळ

    उद्धव ठाकरे म्हणाले, दोघांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा; पण त्यामुळे भाजपच्या अंगावर कुठे उठतोय ओरखडा??