• Download App
    लाल, पांढऱ्या वस्तू महागणार ,पाऊस समाधानकारक राजकीय स्थैर्य परंतु घबराटीचे वातावरण ; सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील 'भाकणूक'|Red, white goods will be more expensive, rain will be satisfactory Political stability but with fear ; 'Bhakanuk' from Siddheshwar Yatra in Solapur

    लाल, पांढऱ्या वस्तू महागणार ,पाऊस समाधानकारक राजकीय स्थैर्य परंतु घबराटीचे वातावरण ; सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेतील ‘भाकणूक’

    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेत ‘भाकणूक’ प्रथेला मोठं महत्व आहे. येत्या वर्षात हवामान आणि वातावरणाची दिशा कशी असणार याचं भविष्य यातून मांडलं जाते. यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचे भाकणुकीमध्ये सांगितले. भीतीचे वातावरण कायम राहिलं तसेच राजकीय क्षेत्रात स्थिरता दिसून येईल अशी ‘भाकणूक’ केली आहे.Red, white goods will be more expensive, rain will be satisfactory Political stability but with fear ; ‘Bhakanuk’ from Siddheshwar Yatra in Solapur

    ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होमप्रदीपन विधी नंतर दिवसभर उपाशी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला भाकणूकस्थळी आणले जाते.
    याठिकाणी त्या वासराची विधिवत पूजा करण्याते येते,



    मैदानावर अंथरलेल्या घोंगडीवर खारीक, विविध प्रकारचे धान्य, गूळ, खोबरे, बोर, गाजर, पाने, ऊस आदी खाद्यवस्तू ठेवण्यात येतात.यंदा या वासराने ऊस, गजाराला स्पर्श केल्याने लाल आणि पांढऱ्या वस्तू महागणार,अशी भाकणूक करण्यात आली.

    दरम्यान, या वासरासमोर पेटता टेंभा धरण्यात आला तेंव्हा वासरू बिथरले. यावरून येत्या काळात घाबराटीचे वातावरण राहणार असल्याचे सांगण्यात आले. तर शेवटी वासराने मूत्र विसर्जन केल्यामुळे यंदा पाऊस समाधानकारक असल्याचे भाकणुकीत नमूद करण्यात आले.

    Red, white goods will be more expensive, rain will be satisfactory Political stability but with fear ; ‘Bhakanuk’ from Siddheshwar Yatra in Solapur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक