• Download App
    महाराष्ट्रात 7000 पोलिसांची भरतीचे आदेश आणखी 7000 पदांची प्रक्रिया सुरू!!Recruitment order of 7000 policemen in Maharashtra, process of 7000 more posts started

    महाराष्ट्रात 7000 पोलिसांची भरतीचे आदेश आणखी 7000 पदांची प्रक्रिया सुरू!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात गृह विभागात लवकरात लवकर 7000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली. यात आणखी 7000 पोलिसांची भरती प्रक्रियेची भर घालण्यात येईल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले आहे. Recruitment order of 7000 policemen in Maharashtra, process of 7000 more posts started

    विधानसभेत लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच 7000 पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आणखी 7000 पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    अधिकाऱ्यांची नियुक्ती मर्यादित काळासाठीच

    नवी मुंबई परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत चौकशी केली जाईल आणि दोषी आढळल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. तसेच एका अधिकाऱ्यास एकाच पदावर अथवा शहरात जास्त काळ नियुक्ती दिली जाऊ नये, याबाबत दक्षता घेतली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याबाबत सदस्या मंदा म्हात्रे यांनी चर्चा उपस्थित केली होती.

    Recruitment order of 7000 policemen in Maharashtra, process of 7000 more posts started

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ