प्रतिनिधी
संभाजीनगर : संभाजीनगरचा अनेक वर्षांपासून रेंगाळलेला पाणी प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या 8 जूनच्या सभेपूर्वी “जाग” आल्यामुळे दिल्या आहेत. पाणीप्रश्न सारखाच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा गाजतो आहे. त्यामुळे शहराचे नामांतर ही केव्हाही होऊ शकते, असे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. पण मुख्यमंत्री खरंच औरंगाबादचे नामांतर करणार?? की सभेपूर्वी सोडलेली चर्चेची पुडी ठरणार??, हे लवकरच समजणार आहे!! Really renamed Aurangabad, Osmanabad
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यासंदर्भातल्या फाईली तयार आहेत. मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांनी त्यावर अंतिम निर्णय देखील घेतला आहे. त्यामुळे औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराची घोषणा कधीही होऊ शकते, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शहरांच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
– शिवसेना, भाजपचा पाठिंबा
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला शिवसेना आणि भाजपा यांचा हिंदुत्ववादी पक्ष म्हणून पाठिंबा असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा प्रचंड विरोध आहे. हे शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर सरकार चालवत आहेत ते स्वतः अनेकदा औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करतात. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री औरंगाबाद असाच उल्लेख करतात. त्यामुळे मध्यंतरी मी संभाजीनगर म्हटले म्हणजे नामांतर झालेच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. परंतु त्यानंतर त्यांना भाजपच्या टीकेच्या तोफांचा सामना करावा लागला होता.
आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 8 जून रोजी संभाजीनगर मध्ये सभा आहे. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे यांची सभा झाली आहे, त्याच मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा आहे. या पार्श्वभूमीवरच चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांच्या नामांतराचा मुद्दा कोणा छेडला आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री खरंच दोन्ही शहरांचे नामांतर करणार आहेत?? की मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी सोडलेली ही चर्चेची पुडी आहे?? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
– नामांतर झाले तर काँग्रेस-राष्ट्रवादी काय करणार?
पण चंद्रकांत खैरे यांच्या म्हणण्यानुसार खरंच मुख्यमंत्र्यांनी नामांतराच्या फायलींवर सह्या केल्या आणि औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशिव असे नामांतर केले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही सत्ताधारी पक्ष नेमकी काय भूमिका घेणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
Really renamed Aurangabad, Osmanabad
महत्वाच्या बातम्या