प्रतिनिधी
मुंबई : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींच्या शेगाव सभेचे राजकीय टाइमिंग साधत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर एकापाठोपाठ एक ट्विटरच्या फैरी झाडल्या आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमान करणारे वक्तव्य राहुल गांधींनी केल्यानंतर महाराष्ट्रभरात त्यांच्याविरुद्ध वादळ उठले असताना फडणवीस यांनी काँग्रेसच्याच नेत्यांचा हवाला देत राहुल गांधी यांच्यावर शरसंधान साधले आहे. Read the letters of Gandhiji, Radhakrishnan, Indiraji, Narasimha Rao, Yashwantrao, Balasaheb Desai, Pawar; Fadnavis’ attack on Rahul Gandhi
महात्मा गांधी, माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांची वक्तव्ये आणि पत्रे देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक ट्विट केली आहेत. या सर्वांमधला समान धागा स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अधोरेखित करणारा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले आहे. इतकेच नाही, तर कम्युनिस्ट पक्षाचे सर्वात मोठे नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी सावरकरांना वाहिलेली श्रद्धांजली देखील देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केली आहे.
वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला आणि सामाजिक योगदानाला नमन केल्याचे फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले आहे. वर उल्लेख केलेला एकही नेता सावरकरांच्या राजकीय पक्षाचा सदस्य नव्हता, तर कॉम्रेड डांगे वगळता सर्व नेते हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. यामध्ये दोन माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी आणि पी. व्ही. नरसिंह एक माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचाही समावेश होता. हे सर्व नेते त्यांच्या पदांवर विद्यमान असताना त्यांनी सावरकरांवर सावरकरांच्या योगदानाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केल्याचे फडणवीस यांनी आवर्जून नमूद केले आहे. त्याच वेळी दरवेळी सावरकरांचा अपमान करता त्यावेळी आपण फक्त आपल्या वोट बँकेचा विचार करता का याची करावी तितकी निंदा कमी आहे असे शरसंधानही फडणवीस यांनी सोडले आहे.
राहुल गांधींनी काल एक पत्र दाखवून सावरकरांनी आपण ब्रिटिशांचे नम्र नोकर राहू इच्छितो असे म्हटल्याचे म्हटल्याचा दावा केला होता. या दाव्याला देखील फडणवीस यांनी खोडून काढण्यासाठी महात्मा गांधींचे तशाच आशयाचे पत्र ट्विट केले आहे आणि आपण महात्मा गांधींना सुद्धा ब्रिटिशांचे नोकर म्हणणार का?, असा सवाल केला आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने शेगावात सभा होत असताना त्याचे राजकीय टाइमिंग अजून फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर एकापाठोपाठ एक ट्विटरच्या फैरी झाडल्या आहेत.
Read the letters of Gandhiji, Radhakrishnan, Indiraji, Narasimha Rao, Yashwantrao, Balasaheb Desai, Pawar; Fadnavis’ attack on Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
- ISRO ने रचला इतिहास; पहिले खासगी राॅकेट विक्रम-S प्रक्षेपित; वाचा वैशिष्ट्ये
- सावरकरांच्या अपमानापूर्वी आणि नंतर : उद्धव गटाची मध्यावधी निवडणुकीची पेरणी, ते आता महाविकास आघाडीत फुटीचा इशारा
- एसईबीसी उमेदवारांना आर्थिक दुर्बल आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या; शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय
- भगवान श्रीकृष्णाच्या बेट द्वारकेत 6.50 कोटींच्या जमिनीवर कब्जा; मशिदी, मजारींचे बांधकाम; 40 % अतिक्रमणांवर बुलडोझर