वृत्तसंस्था
मुंबई : रेमंड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी सोमवारी जाहीर केले की ते आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया 32 वर्षांच्या लग्नानंतर वेगळे होत आहेत. गौतम सिंघानिया म्हणाले की, यंदाची दिवाळी पूर्वीसारखी राहणार नाही. नवाज आणि मी येथून वेगळ्या मार्गावर जाऊ… आम्ही वेगळे होत आहोत, मात्र निहारिका आणि न्यासा या आमच्या दोन मौल्यवान हिऱ्यांसाठी आम्ही जे चांगले आहे ते करत राहू.Raymond’s MD Gautam Singhania’s divorce; Married to Nawaz 32 years ago
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाज मोदी सिंघानिया यांना गेल्या आठवड्यात ठाण्यात त्यांच्या पतीच्या दिवाळी पार्टीत जाण्यापासून रोखण्यात आले होते. गेल्या महिन्यात गौतम यांनी नवाजवर त्याच्या ब्रीच कँडीच्या घरात हल्ला केला आणि त्यांचे कॉलर बोन तुटले होते. यानंतर त्यांना गिरगावचे सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली नाही.
गौतम यांच्या पत्नी नवाज पारशी आहेत
गौतम यांच्या पत्नी नवाज या पारशी आहेत. त्या एक कलाकार आहेत आणि त्यांनी मुंबईत अनेक कला प्रदर्शनांचे आयोजन केले आहे. गौतम यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, पारशी मुलीला पत्नी बनवणे सोपे नव्हते. नवाज यांचे वडील लग्नासाठी तयार नव्हते, पण मुलीच्या आग्रहापुढे त्यांना नमते घ्यावे लागले.
लग्नानंतरही गौतम आणि नवाज यांना सांस्कृतिक फरकांमुळे अनेक तडजोडी कराव्या लागल्या. गौतम यांच्या वडिलांनी त्याला सांगितले की, लग्नासाठी प्रेम आवश्यक आहे, मग तुम्ही कोणाचीही निवड करा.
Raymond’s MD Gautam Singhania’s divorce; Married to Nawaz 32 years ago
महत्वाच्या बातम्या
- अमेरिकेत शिकणाऱ्या पदवीधर भारतीय विद्यार्थी संख्येने गाठला उच्चांक!!
- युद्धानंतर गाझाचे भविष्य काय असेल, अमेरिकेसोबत कसे सुरू आहे नियोजन? इस्रायलच्या राजदूत म्हणाले…
- हैदराबादमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग; चार दिवसांच्या चिमुकल्यासह ९ जणांचा होरपळून मृत्यू
- काँग्रेस मध्य प्रदेशात सोन्याचे महाल बांधणार, पण बटाट्यातून सोने काढून का??; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला खोचक टोला