विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ravindranath Patil विधानसभा निवडणुकीपूर्वी उघडकीस आलेल्या कथित बिटकॉईन घोटाळ्यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणातील ऑडिओ हे फेक असल्याचे सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी म्हटले आहे. मात्र, आपल्याकडे सुळे आणि पटोले यांच्या विरोधातील सर्व पुरावे असल्याचा दावा या प्रकरणातील प्रमुख आरोपकर्ते माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांनी केला आहे. इतकेच नाही तर या प्रकरणात आपण निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. Ravindranath Patil
या संदर्भात माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे रवींद्रनाथ पाटील हे 2022 मध्ये बिटकॉईनशी संबंधित एका प्रकरणात तुरुंगात गेले होते. 14 महिने तुरुंगात होते. पण आता या गेममध्ये अनेक लोक गुंतले होते, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचेही ते म्हणाले. सुळे आणि पटोले यांच्या ऑडिओ क्लिपची योग्य पद्धतीने आपण तपासणी केली असल्याचा दावाही त्यांनी केला. मी स्वत: फॉरेन्सिक एक्सपर्ट असून सर्व पुरावे तपासल्यानंतरच आपण आरोप केले असल्याचा दावा देखील पाटील यांनी केला आहे. Ravindranath Patil
बखर लाईव्हच्या वृत्ताची दखल, क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यावर भाजप राष्ट्रीय प्रवक्त्यांचे पाच प्रश्न
नेमका आरोप काय?
माजी आयपीएस रवींद्रनाथ पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. बिटकॉइनच्या माध्यमातून निवडणुकीला निधी दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यामध्ये बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. पाटील म्हणाले की, “2018 मध्ये गेन बिटकॉइन नावाची पॉन्झी स्कीम चालवली जात होती. त्यात दिल्लीतील रहिवासी असलेल्या अमित भारद्वाज नावाच्या व्यक्तीने एक बिटकॉईन दिल्यास 1.8 बिटकॉइन्स मिळतील, अशी योजना केली होती. 18 महिने “बऱ्याच लोकांनी बिटकॉइन रोखीने घेतले, ज्याची नंतर पडताळणी होऊ शकली नाही.”
सायबर क्राईमध्ये तक्रार – सुप्रिया सुळे
या संदर्भात शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, रवींद्र पाटील हे एक बोगस आयपीएस अधिकारी होते. ते दोन वर्षे जेलमध्ये राहून आले आहेत. त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात मी सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली आहे. पुण्याच्या पोलिस आयुक्तांशी मी यावर चर्चा केली आहे. बिटकॉनविरोधी जर संसदेत कोणी सर्वाधिक बोलले असेल तर मी बोलले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मानहाणीची नोटीस बजावण्यात येणार – पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीत बिटकॉईनच्या वापराविषयी भाजपने केलेला आरोप जोरकसपणे फेटाळून लावला आहे. भाजपने रवींद्र पाटील नामक जो आयपीएस अधिकारी उभा केला आहे, तो मुळात आयपीएसच नाही. तो एक तोतया आहे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला हे बिटकॉईन प्रकरण समजत नाही. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, मानहाणीची नोटीसही बजावण्यात येणार आहे, असे पटोले यांनी म्हणाले आहे.
Ravindranath Patil said – I have all the evidence against Supriya Sule-Nana Patole
महत्वाच्या बातम्या
- बखर लाईव्हच्या वृत्ताची दखल, क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यावर भाजप राष्ट्रीय प्रवक्त्यांचे पाच प्रश्न
- Amitabh Gupta अमिताभ गुप्ता म्हणाले दीडशे कोटी दुबईला पोहोचवा, सुप्रिया सुळे म्हणाल्या लवकर कॅश हवी
- Supriya Sule, Nana Patole : क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यातील पैशाची चोरी करून महाविकास आघाडीचा निवडणुकीचा खर्च, सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी अमिताभ गुप्तांवर आणला दबाव