भाजपाचे हेमंत रासने पराभूत; २८ वर्षानंतर भाजपाचा बालेकिल्ल्यात पराभव
प्रतिनिधी
पुणे : राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी ११ हजार ४० मतांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला.Ravindra Dhangekar of Mahavikas Aghadi won in Kasba constituency in Pune
महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर हे मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते, त्यांची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. रविंद्र धंगेकर यांना ७२ हजार ५९९ मतं मिळाली आहेत. तर हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळवता आली. मागील २८ वर्षांपासून कसबा मतदारसंघ हा भाजपाचा गड राहिला होता. यंदा मात्र तो काँग्रेसच्या ताब्यात गेला आहे. धंगेकरांच्या विजयामुळे महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.
पाच वर्षांत ४७ वेळा पंतप्रधान मोदींचा ईशान्येस दौरा; आठ पैकी सहा राज्यांमध्ये भाजपाचे सरकार!
भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. या ठिकाणी टिळक कुटुंबातूनच उमेदवार दिला जावा, अशीदेखील मागणी करण्यात आली होती. मात्र भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने काहीसे नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे बोलले जात होते.
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली आहे. याशिवाय मतदानाच्या दिवशी घडलेल्या हाणामारीच्या घटना, रविंद्र धंगेकराकडून भाजपावर करण्यात आलेला पैसे वाटपाचा आरोप, दिग्गज नेत्यांच्या प्रचार रॅली या सगळ्या पार्श्वभूमीवर या निवडणूक निकालाकडे सर्वांच्या नजरा होत्या.
Ravindra Dhangekar of Mahavikas Aghadi won in Kasba constituency in Pune
महत्वाच्या बातम्या
- काँग्रेस आमदार सफिया जुबेर म्हणाल्या- आम्ही राम-कृष्णाचे वंशज : अमीन खान म्हणाले – भारत धर्मनिरपेक्ष मानले जात नाही, हिंदू राष्ट्रातही कोणी मारणार नाही
- केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये राहुल गांधींचे भाषण: म्हणाले- जिथे लोकशाही नाही, असे जग निर्माण होताना पाहू शकत नाही
- पाच वर्षांत ४७ वेळा पंतप्रधान मोदींचा ईशान्येस दौरा; आठ पैकी सहा राज्यांमध्ये भाजपाचे सरकार!