विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ताबडतोब निवडणूक आयोगाला पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांमध्ये विसंगती आहे. जर अपिलाचा निर्णय 26 नोव्हेंबर नंतर लागला असेल आणि उमेदवार प्रतिज्ञापत्र द्यायला तयार असतील, तर निवडणुका आधीच्याच वेळापत्रकानुसार पुढे चालू ठेवाव्यात, अशी मागणी चव्हाण यांनी निवडणूक आयोगाकडे केली.
राज्यातल्या निवडणुका आयोगाने न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका पुढे ढकलल्या. गेल्या दोन आठवड्यापासून जिथं प्रचाराचा धुरळा उडत होता. तिथं अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फेरले. जिथं निवडणूक पुढे ढकलली, तिथल्या निवडणुकीचा नवा कार्यक्रमही जाहीर झाला. जिथं जिथं निवडणूक पुढे ढकलली तिथं आता 20 डिसेंबरला मतदान होईल आणि 21 तारखेलाच मतमोजणी होणार आहे. उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळत पार पडणार आहे. निवडणुकीच्या या निर्णयावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतले आहेत.
निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला आहे. कुठला कायदा निवडणूक आयोग काढतोय. ते मला माहिती नाही, माझ्या अभ्यासानुसार निवडणुका पुढे ढकलता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. या ठिकाणी निवडणूक पुढे ढकलणं अत्यंत चुकीचं आहे. उद्या निवडणुका आणि आज निवडणुका पुढे ढकलतात हे खूप चुकीचं आहे. अनेक उमेदावारांची प्रचाराची मेहनत वाया गेली. निवडणूक आयोग स्वायत्त असलं तरीही अशाप्रकारे निर्णय घेणं चुकीचंच आहे. याबद्दल रिप्रेझंटेशन आम्ही निवडणुक आयोगाला देऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. त्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून निवडणुका जसाच्या तशा पुढे सुरू ठेवण्याची मागणी केली.
22 नगराध्यक्षपदांच्या निवडणुकांना स्थगिती
अमरावती विभाग :
बाळापूर
अंजनगाव सुर्जी
यवतमाळ
देऊळगाव राजा
वाशिम
कोकण विभाग :
अंबरनाथ
छ.संभाजीनगर विभाग :
फुलंब्री
धर्माबाद
मुखेड
रेणापूर
वसमत
नागपूर विभाग :
घुग्घूस
देवळी
नाशिक विभाग :
देवळाली-प्रवरा
कोपरगाव
पाथर्डी
नेवासा
पुणे विभाग :
बारामती
फुरसुंगी-उरळी देवाची
महाबळेश्वर
फलटण
मंगळवेढा
अनगर
नगरपालिका,नगरपंचायत निवडणुकीचा सावळागोंधळ
नगराध्यक्षपद घोषणा
288
बिनविरोध
3
स्थगित
22
उद्या मतदान
253
Ravindra Chavan’s letter to the Election Commission
महत्वाच्या बातम्या
- Lt Gen Manjinder Singh : लेफ्टनंट जनरल म्हणाले- पाकने 90 तासांत गुडघे टेकले, ऑपरेशन सिंदूरमध्ये दीर्घ लढाईची तयारी होती
- Adani : अदानींनी 5 वर्षांपूर्वीचा कायदेशीर खटला संपवला; कोळसा खाण प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या कार्यकर्त्याशी समझोता
- पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कंबर कसून उतरल्या का नाहीत??
- भय्याजींच्या दूरदृष्टीतून ईशान्य भारतात ईश्वरी कार्य ऊभे; भैय्याजी जोशींचे गौरवोद्गार; भैय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता