• Download App
    Ravindra Chavan रवींद्र चव्हाण भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेच

    Ravindra Chavan रवींद्र चव्हाण भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेच

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिर्डी येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय महाधिवेशनाआधी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. चव्हाण यांची पुढील काळात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. तुर्तास चंद्रशेखर बावनकुळे हेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. Ravindra Chavan

    एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये रवींद्र चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची जबाबदारी होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. मंत्रिपद डावलल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षातील मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. त्याप्रमाणे त्यांची कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती झाली आहे. बावनकुळे यांच्याकडे असलेली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पुढील काळात रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली जाणार आहे. भाजप पक्षसंघटनेत यापूर्वी कार्यकारी अध्यक्षपद असे पद अस्तित्वात नव्हते. रविंद्र चव्हाण यांना याआधी संघटनात्मक बांधणीचे काम देऊन संघटन प्रभारी केले होते. यानंतर आता कार्यकारी अध्यक्षपदाची नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडेपर्यंत चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रदेशाध्यक्षपद कायम राहणार असल्याची माहिती आहे.

    स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपर्यंत बावनकुळे पदावर राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    रविंद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते म्हणून ओळख.  रविंद्र चव्हाण हे मूळ कोकणातील आहेत, परंतु डोंबिवली मतदारसंघातून ते निवडून येतात
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटवर्तीय म्हणूनही त्यांना ओळखले जाते. चव्हाण यांनी मंत्रिमंडळातही काम केले आहे, प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे. डोंबिवलीतून ते चौथ्यांदा विजयी झाले आहेत.

    Ravindra Chavan BJP’s Maharashtra Executive President

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!

    Devendra Fadnavis : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे खेळाडूंच्या मेहनतीला राजमान्यता – देवेंद्र फडणवीस