विशेष प्रतिनिधी
मुंबई : Ravindra Chavan भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानावर गोळीबार करण्याचे पाप कॉंग्रेसचे आहे, हे इतिहासात नोंदलेले सत्य असूनही ठाकरे गट जाणीवपूर्वक त्याकडे डोळेझाक करत आहे, अशीह टीका चव्हाण यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Ravindra Chavan
रवींद्र चव्हाण म्हणाले, 16 जानेवारी 1956 रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. या आंदोलनावर गोळीबार करणारे सरकार हे राज्यातही आणि केंद्रातही कॉंग्रेसचेच होते. हा सोयीस्कर विसर ठाकरेंना पडतो, अशी टीका चव्हाण यांनी केली.Ravindra Chavan
ठाकरेंना मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर पडला
पुढे रवींद्र चव्हाण म्हणाले, या घटनांतूनच प्रेरणा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. हे त्रिकालबाधित सत्य आहे. मात्र आज ठाकरे गट कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून मराठीचा कैवार घेत आहे, ही मोठी विसंगती असल्याचे चव्हाण म्हणाले. काँग्रेसच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापन करून 105 हुतात्म्यांचा अपमान केला. केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी करताना मराठी अस्मितेचा सोयीस्कर विसर पडला, हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे, असे चव्हाण म्हणाले.
काँग्रेसने कोकणासाठी काहीच केले नाही
1990 च्या दशकात कोकण रेल्वे सुरू झाली ती काँग्रेसमुळे नव्हे, तर मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्यांमुळे. 2014 नंतर मात्र भाजप सरकारच्या काळात कोकण रेल्वेवरील स्थानके सुसज्ज झाली आणि परिसराचा कायापालट झाला. काँग्रेसने कोकणासाठी काहीच केले नाही, असा आरोपही रवींद्र चव्हाण यांनी केला.
फडणवीसांच्या प्रयत्नांमुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला
ठाकरेंची सेना आणि मनसे हे इतरांपेक्षा जास्त मराठीचे कैवारी कसे, असा सवाल उपस्थित करत रवींद्र चव्हाण म्हणाले की, अमराठी भाषिक भाजपात मराठीद्वेषातून येत नाही, तर इतर पक्षांमध्ये नेतृत्व, विचारधारा आणि भवितव्य मर्यादित असल्यामुळे भाजपात येतो, हे वास्तव आहे. भाजपाने मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसासाठी ठोस काम केले आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच, असेही चव्हाण म्हणाले.
मुंबईची मराठी ओळख पुसण्याचे पातक कोणी केले?
पुढे रवींद्र चव्हाण म्हणाले, मुंबईतील बीडीडी चाळींमधील मराठी बांधवांना हक्काचे घर मिळाले, ते केवळ देवेंद्र फडणवीस सरकारच्या पुढाकारामुळेच शक्य झाले. निवडणुका आल्या की ठाकरेंना मराठी माणूस आठवतो, अन्यथा पाच वर्षे मराठी हा शब्दही विसरलेला असतो, अशी टीका रवींद्र चव्हाण यांनी केली. ‘मी मराठी’ ही ओळख बदलून ‘मी मुंबईकर’ ही संकल्पना कोणी लादली, आणि मुंबईची मराठी ओळख पुसण्याचे पातक कोणी केले, याचे उत्तर उद्धव ठाकरे यांनी द्यावे. भावनांचे बुडबुडे नव्हे तर प्रत्यक्ष काम महत्त्वाचे असते, आणि ते काम फक्त भाजपने करून दाखवले आहे, असे रवींद्र चव्हाण म्हणाले.
Ravindra Chavan Attacks Uddhav Thackeray Congress Alliance Martyrs Insult Photos VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळेंचे केंद्रीय मंत्रिपद अजितदादांनी फेटाळले; दुसऱ्या फुटीच्या भीतीने दोन राष्ट्रवादींचे ऐक्यही टाळले!!
- मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अजितदादा अडकले; बाजीराव पेशव्यांना “कर्तृत्ववान” म्हणावे लागले!!
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार-निवडणूक आयुक्तांना नोटीस; निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर मागितले उत्तर
- ED raids : I-PAC छापेमारी वाद; ईडीची सर्वोच्च न्यायालयात याचिका; ममता यांच्यावर चौकशी थांबवल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप