• Download App
    रविकांत तुपकर यांच्या गाडीचा झाला अपघात ; दोन युवक गंभीर जखमी । Ravikant Tupkar's car had an accident; Two youths seriously injured

    रविकांत तुपकर यांच्या गाडीचा झाला अपघात ; दोन युवक गंभीर जखमी

    • या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. तर, रविकांत तुपकर हे सुखरुप आहेत. Ravikant Tupkar’s car had an accident; Two youths seriously injured

    विशेष प्रतिनिधी

    बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी बुलडाण्यात अन्नत्याग आंदोलन केले होते.कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान तुपकर यांनी अन्नत्याग केल्याने आंदोलनात त्याची प्रकृती खालावली. दरम्यान यावेळी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी रविकांत तुपकर यांच्यासोबत चर्चा करत हे आंदोलन स्थगित करा आणि येत्या बुधवारी मंत्रालय येथे बैठक लावून चर्चा घडवून तोडगा काढू असं आश्वासन दिले.

    दरम्यान आज सोयाबीन-कापुसप्रश्नी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने
    अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बेराळा फाट्याजवळ घडली.



    नेमकी घटना काय घडली

    आज सोयाबीन-कापुसप्रश्नी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला चालले होते.दरम्यान बेराळा फाट्याजवळ वेगाने जात असलेल्या तुपकर यांच्या वाहनासमोर रस्ता क्रॉस करताना दुचाकी घेऊन अचानक दोन युवक आले. रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला. सोमवारच्या रात्री ही घटना घडली.

    या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. तर, रविकांत तुपकर हे सुखरुप आहेत.रविकांत तुपकर यांच्या वाहनाचा वेगही अधिक होता घटनेनंतर लगेच जखमी युवकांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र दोन्ही युवकांना गंभीर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले आहे.

    Ravikant Tupkar’s car had an accident; Two youths seriously injured

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!