प्रतिनिधी
अमरावती : वाद मिटला, असे म्हणता म्हणता आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातला वाद पुन्हा पेटला आहे. Ravi Rana-Bachchu bitter dispute flared up again
शिंदे फडणवीस सरकारचे समर्थन करणाऱ्या या दोन्ही आमदारांमध्ये जोरदार वाद पेटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांची समजूत काढली. दोघांनी माघारही घेतली. पण त्यानंतर
बच्चू कडू यांनी मेळावा घेतला. त्यात जी काही भाषणे झाली, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमदार रवी राणा यांनी आपल्यात समोरच्याच्या घरात घुसून मारण्याची हिंमत आहे असे वक्तव्य केले. हे वक्तव्य केल्यानंतर बच्चू कडू यांचे समर्थक अस्वस्थ झाले तेही आक्रमक उत्तर देण्याच्या तयारीत होते.
राज्यसभा निवडणूक : चंद्रकांतदादांच्या हुरळल्या मेंढीवर बच्चू कडूंनी ओतले पाणी!! कसे ते वाचा!!
परंतु, बच्चू कडू यांनी रवी राणांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देण्यासाठी एक व्हिडिओ जारी केला आणि त्यामध्ये त्यांनी सौम्य भूमिका घेत रवी राणा माझ्या घरात तलवार घेऊन घुसले तरी मी त्यांचे स्वागत फुल देऊनच करेन. त्यांना जेवढे माझे तुकडे करायचे ते करू द्यात, असे बच्चू कडू म्हणाले.
त्याच वेळी बच्चू कडू यांनी आपण आपापसात भांडत राहिलो तर शेतकरी, दिव्यांग सर्वसामान्य जनता यांचे विषय मागे पडतील. तसे आपण करायला नको, असा इशारा बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांना दिला आहे.
पण एकूण आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातला वाद मिटला मिटला असे म्हणत असतानाच तो आज दोन नोव्हेंबर 2022 रोजी परत एकदा पेटल्याचे बघायला मिळाले.
Ravi Rana-Bachchu bitter dispute flared up again
महत्वाच्या बातम्या
- वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प शिंदे – फडणवीस सरकारच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्याच काळात गेला; माहिती अधिकारातून खुलासा
- लिबरल्सना राहुल गांधींच्या नेतृत्वाचे आकर्षण; बॉलिवूड पासून दूर पूजा भट्ट भारत जोडो यात्रेत सामील
- दहशतवादाला बळी पडलेल्यांच्या वारसांसाठी मेडिकलच्या जागा राखीव; केंद्र सरकारचा निर्णय
- सरकारी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत बंपर भरती; करा अर्ज