विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपात आपली थोडीफार प्रतिष्ठा टिकवून ठाकरे + पवारांना डबल डिजिटमध्ये ढकलणाऱ्या काँग्रेसला स्वतःचे नेते मात्र टिकवताना अवघड झाले. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आज काँग्रेसमध्ये नेते फुटल्याचे फटाके वाजले. काँग्रेसचे दोन बडे नेते आज भाजप आणि शिंदेंकडे निघून गेले. Ravi Raja congress leader join bjp maharashtra
मुंबईमध्ये महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि सायन मधले काँग्रेसचे मोठे नेते रवी राजा यांनी वर्षा गायकवाड यांच्यावर आरोप करत काँग्रेसला रामराम ठोकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला शक्तिशाली नेत्यांचा उपयोग करून घेता येत नाही. किंवा नेत्यांचा प्रभाव देखील काँग्रेसला सहन होत नाही, असा आरोप करून रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजपा प्रवेशाचा भाजप उमेदवार तमिळ सेल्वम यांना चांगला लाभ होईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
कोल्हापुरात काँग्रेसला धक्का
दुसरीकडे कोल्हापूर उत्तरच्या माजी आमदार जयश्री जाधव यांनी काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसने कोल्हापूर उत्तर मधून जयश्री जाधवांचे तिकीट कापून ते मालोजी राजेंच्या पत्नी मधुरिमा राजे यांना दिले. त्यांचे सासरे शाहू महाराज आधीच काँग्रेसचे खासदार आहेत. त्यात काँग्रेसने आमदारकीचे तिकीट मधुरिमा राजे यांना दिले. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसमध्ये किंमत उरली नाही, असा आरोप करून जयश्री पाटलांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा रस्ता धरला.
महाविकास आघाडीत काँग्रेसने स्वतःची प्रतिष्ठा थोडीफार टिकवली. काँग्रेसने ठाकरे पवारांना जागा वाटपात डबल डिजिट वर ढकलले, पण स्वतःचे नेते मात्र टिकवताना काँग्रेसला अवघड झाले हे रवी राजा आणि जयश्री पाटील यांच्या काँग्रेस सोडण्यावरून स्पष्ट झाले.
Ravi Raja congress leader join bjp maharashtra
महत्वाच्या बातम्या
- BJP : पवारांनी केली अजितदादांच्या राष्ट्रवादीची फोडाफोडी, पण भाजपची मित्र पक्षांना उमेदवार पुरवठादारी मोठी!!
- Uddhav Thackeray : पवारांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदात खोडा घातला, तर ठाकरे कशाला सुप्रियांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा देतील??
- Ayodhya : अयोध्येत दीपोत्सवाद्वारे रचले गेले दोन विश्वविक्रम!