• Download App
    BJP Ravi Landge Wins Unopposed Pimpri Chinchwad Election PHOTOS VIDEOS CCTV Footage पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पहिला गुलाल! रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध; अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का

    BJP Ravi Landge : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पहिला गुलाल! रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध; अजितदादांच्या राष्ट्रवादीला धक्का

    BJP Ravi Landge

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : BJP Ravi Landge राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडींच्या बाबतीत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीने आपली पकड घट्ट केली असून, यामध्ये भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजयी ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर भाजपच्या खात्यात आता 12 व्या बिनविरोध उमेदवाराची भर पडली असून, पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदारसंघाच्या प्रभाग 6 ‘ब’ मधून रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या वाढत्या आकड्यामुळे निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच महायुतीने राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.BJP Ravi Landge

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भाजपने विजयाचे खाते उघडले असून रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले आहेत. 2017 च्या निवडणुकीत जेव्हा भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मोडीत काढला होता, तेव्हाही रवी लांडगे यांनीच पक्षाचा पहिला विजय नोंदवला होता आणि आता पुन्हा एकदा त्यांनी त्याच इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. प्रभाग 6 ‘ब’ मधील या विजयाची आता केवळ अधिकृत घोषणा बाकी असून, या यशामुळे आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजप समर्थकांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोष साजरा केला आहे.BJP Ravi Landge



    या विजयाचा मार्ग प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्ज बाद होण्याने आणि माघारीने सुकर झाला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार निलेश सूर्यवंशी यांचा ओबीसी दाखला अवैध ठरल्याने त्यांचा अर्ज बाद झाला, त्यानंतर रिंगणात असलेल्या अपक्ष उमेदवार श्रद्धा लांडगे आणि प्रसाद ताठे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. विशेष म्हणजे, अपक्ष उमेदवार प्रसाद ताठे यांनी आपल्यावर कोणताही दबाव नसून, केवळ प्रभागाच्या विकासासाठी आणि रवी भाऊंच्या विचारांना पाठिंबा देण्यासाठी आपण माघार घेत आहोत, असे स्पष्ट केल्याने रवी लांडगे यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

    आमदार महेश लांडगे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भोसरीसह शहरातील गावकी-भावकी एक राहिली पाहिजे. त्यासाठी शक्य त्या ठिकाणी राजकीय हेवे-दावे बाजूला ठेवून शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करा, असा संदेश दिला होता. त्यानंतर, रवी लांडगे यांचा प्रवेश आणि पुन्हा बिनविरोध निवड होत असताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.

    BJP Ravi Landge Wins Unopposed Pimpri Chinchwad Election PHOTOS VIDEOS CCTV Footage

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nana Patole : नाना पटोलेंनी राहुल गांधींची तुलना श्रीरामांशी केली; म्हणाले- राहुल गांधींचे काम प्रभू रामचंद्रांसारखेच!

    BJP Shiv Sena Shinde : भाजपसह शिवसेनेचीही विजयाची घोडदौड; कल्याण-डोंबिवली महापालिकेत 9, तर राज्यभरात 13 नगरसेवक बिनविरोध

    पिंपरी चिंचवडच्या विकासाचे सारथी लक्ष्मण जगताप यांच्या शक्तिस्थळ’चे लोकार्पण