• Download App
    रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला ; सुदैवाने कोणतीही जीवितहाणी नाही । Ratnagiri district was once again shaken by the earthquake; Fortunately, no casualties were reported

    रत्नागिरी जिल्हा पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला ; सुदैवाने कोणतीही जीवितहाणी नाही

    राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री चार रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तिव्रता नोंदवण्यात आली आहे. Ratnagiri district was once again shaken by the earthquake; Fortunately, no casualties were reported


    विशेष प्रतिनिधी

    रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहेत.तसेच महिन्याभरातील भूकंपाची ही दुसरी घटना आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील साखरपा, संगमेश्वर आणि देवरूख या परिसराला भुकंपाचे धक्के बसले. रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.नागरिक गाढ झोपेत असताना हा भूंकप झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.भूकंप होत असल्याचे लक्षात येताच नगरिकांनी घराबाहेर धाव घेतली. दरम्यान सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही.



    राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार रात्री चार रिस्टल स्केल एवढी या भूकंपाची तिव्रता नोंदवण्यात आली आहे. मुंबईपासून जवळपास 350 किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते.

    स्थानिक प्रशासनाकडून भूकंपाच्या घटनेचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. एक महिन्याच्या आत रत्नागिरी जिल्ह्याला दोनदा भूकंपाचा धक्का बसला आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

    Ratnagiri district was once again shaken by the earthquake; Fortunately, no casualties were reported

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना