• Download App
    रतन टाटांचा सहाय्यक दूर करणार ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणा, गुडफेलोज स्टार्टअप देणार सोबत|Ratan Tata's assistant will give answer to the loneliness of senior citizens, along with giving goodfellows startups

    रतन टाटांचा सहाय्यक दूर करणार ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणा, गुडफेलोज स्टार्टअप देणार सोबत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा सहाय्यक म्हणून काम केलेल्या शंतनू नायडू याने गुडफेलोज हे स्टार्टअप सुरू केले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील एकाकीपणा दूर करण्याचे काम या स्टार्टअपच्या माध्यमातून केले जाणार आहे. रतन टाटा यांनी म्हटले आहे की, गुडफेलोजची प्रगती कशी होते हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. शंतनू आणि त्याच्या तरुण टीमला खूप खूप शुभेच्छा देतो.Ratan Tata’s assistant will give answer to the loneliness of senior citizens, along with giving goodfellows startups

    2011 च्या जनगणनेनुसार, भारतात जवळपास दीड कोटी ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात. त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याचे मार्ग सापडत असले तरी घर रिकामे असल्याने एकाकीपणा असतो. शंतनू नायडू यांनी सुरू केलेले गुडफेलो हे स्टार्टअप या ज्येष्ठ नागरिकांचा एकाकी दूर करणार आहे. 30 वर्षांपर्यंतच्या तरुण, सुशिक्षित पदवीधरांना ज्येष्ठ नागरिकांसोबत राहून त्यांच्यात मैत्रीचे बंध निर्माण केले जाणार आहे. मैत्रीच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना मदत केली जाणार आहे.



    गुडफेलोजच्या माध्यमातून तरुण पदवीधरांना रोजगार मिळणार आहे. अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांतून उत्साही तरुणांची निवड केली जाणार आहे. एखाद्या नातवंडाप्रमाणे ते ज्येष्ठ नागरिकांसोबत राहणार आहे. त्यांना नियुक्त केलेल्या आजोबांच्या जीवनातील एकटेपणा ते दूर करणार आहेत. सर्व तपासलेले तरुण गुडफेलो त्यांच्या स्वत:च्या आजी-आजोबांसोबत घट्ट नातेसंबंध असणारे असतील.

    आजोबांशी जोडी जमल्यावर गुडफेलो त्यांच्यासाठी एखादा नातू करेल त्याप्रमाणे सर्व काही कामे करेल. आजोबांना फिरायला घेऊन जाणे, चित्रपट पाहणे, किराणा सामानाच्या खरेदीत मदत करणे, डॉक्टरांना भेटणे, तंत्रज्ञान शिकवणे,

    कागदपत्रे आणि ईमेलमध्ये मदत करणे किंवा त्यांच्या आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे यासारखी कामे गुडफेलो करेल. घरातील किंवा बाहेरील त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सहजसोपे करण्यास मदत करेल. अगदी कुटुंबातील सदस्याच्या आपुलकीने आणि उत्साहाने काम करेल. आजोबांना त्यांच्या गुडफेलला किती वेळा भेट द्यायची आहे हे निवडण्याची मुभा असणार आहे.

    Ratan Tata’s assistant will give answer to the loneliness of senior citizens, along with giving goodfellows startups

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!