आंदोलनामुळे जालना – नांदेड महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती.त्यामुळे वाहनधारकांना खूप मनस्ताप सहन करावा लागला.Rastaroko agitation for political reservation for OBC community in Jalna
विशेष प्रतिनिधी
जालना : ओबीसी समजासाठी घटनेने दिलेले राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे.दरम्यान ओबीसी समाजाला आरक्षण नसतानाही राज्यात निवडणुका घेतल्या जात आहे.त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे.दरम्यान ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे,यासाठी ओबीसी समाजाच्या वतीने वाटूर येथे मंगळवारी जालना ते नांदेड महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनामुळे जालना – नांदेड महामार्गावरील वाहतूक तब्बल दोन तास ठप्प होती.त्यामुळे वाहनधारकांना खूप मनस्ताप सहन करावा लागला. यावेळी जागर गोंधळ करून मागण्या मांडण्यात आल्या.यावेळी आंदोलकांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
राज्य शासनाने जोपर्यंत ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणूक घेऊ नये.तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक तो डाटा सादर करावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
Rastaroko agitation for political reservation for OBC community in Jalna
महत्त्वाच्या बातम्या
- पवारांपाठोपाठ राऊत सरसावले; गोवा – यूपीत 100% परिवर्तन होईल म्हणाले!!
- भारतीय नौदलाचे मोठे यश : सुपरसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी, पश्चिम किनारपट्टीवर अचूक लक्ष्यभेद
- भाजपवर टीका करत पवारांनी उत्तर प्रदेशातली काँग्रेस फोडली; माजी आमदार सिराज मेहंदी राष्ट्रवादीत!!
- अंबाबाई मंदिरात नव्या नियमावलीनुसार एका तासाला ४०० भविकांनाच प्रवेश