• Download App
    Rashtriya Swayamsevak Sangh's branches increased by 5,820 across the country; total number of branches reaches 88,949!! देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ५,८२० शाखा वाढल्या; एकूण शाखांची संख्या ८८ हजार ९४९ वर!!

    देशभरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ५,८२० शाखा वाढल्या; एकूण शाखांची संख्या ८८ हजार ९४९ वर!!

    RSS

    विशेष प्रतिनिधी

    समलाखा : देशभरात गेल्या वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ५,८२० शाखा वाढल्या; एकूण शाखांची संख्या ८८ हजार ९४९ वर‌ पोहोचली आहे, अशी माहिती संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीच्या पहिल्या दिवशी जाहीर करण्यात आली.Rashtriya Swayamsevak Sangh’s branches increased by 5,820 across the country; total number of branches reaches 88,949!!

    हरियाणातील समलाखा पट्टीकल्याण येथे संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीला सुरुवात झाली या बैठकीला संघाशी संलग्न असणाऱ्या ३६ हून अधिक संस्था आणि संघटनांचे १४८७ प्रतिनिधी उपस्थित आहेत यामध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन, संघटन मंत्री बी. एल. संतोष, विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अलोक कुमार, राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख शांता कुमारी यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे.



    देशभरात गेल्या वर्षात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ५,८२० शाखा वाढल्या. शाखांची संख्या ८८ हजार ९९४ वर पोहोचल्याची माहिती संघाचे सह सरकार्यवाह सी. आर. मुकुंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. संघ शताब्दीच्या निमित्ताने संघ शाखांचा जास्तीत जास्त विस्तार करायचा मानस त्यांनी बोलून दाखविला. संघशताब्दी वर्षात संघाने पंच परिवर्तनाच्या मुद्द्यावर भर देऊन देशातल्या १० कोटींपेक्षा अधिक कुटुंबीयांशी संपर्क केला आहे. संपर्क मोहीम वर्षभर सुरू राहणार आहे. त्यातून संघ कार्याचा आणखी विस्तार होईल, असा आशावाद मुकुंद यांनी व्यक्त केला.

    Rashtriya Swayamsevak Sangh’s branches increased by 5,820 across the country; total number of branches reaches 88,949!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नरेंद्र मोदी पूर्णपणे कॉम्प्रोमाईज झालेत, संघाला असा पंतप्रधान कसा काय चालतो??; प्रकाश आंबेडकरांचा सवाल

    एकीकडे गॅस टंचाईची होरपळ; दुसरीकडे राज्यात चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता!!

    प्रभावी अस्त्रांचा निकामी वापर; “राहुल बुद्धीच्या” मागे विरोधकांची फरफट!!