सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल, तर रश्मी ठाकरेही मुख्यमंत्री पदासाठी सज्ज; शिवसेना मंत्र्यांचे विधान
प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या विधानानंतर सुरू झालेली महाराष्ट्रातल्या महिला मुख्यमंत्र्याची चर्चा आता रश्मी ठाकरेंवर येऊन पोहोचली आहे, व्हाया सुप्रिया सुळे!! हे सगळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर असताना घडते आहे.
Rashmi Thackeray ready for CM post; Statement of Shiv Sena Minister
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी महिला मुख्यमंत्रीपदाची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केल्यानंतर त्यातच सोमवारी पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होऊ दे, असा नवस खुद्द सुप्रिया सुळे यांनी तुळजाभवनीला केला. पण जर मुख्यमंत्री पदासाठी सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा होत असेल, तर रश्मी ठाकरे देखील यासाठी सज्ज आहेत, असे विधान शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याचा अर्थ पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांच्या बरोबर रश्मी ठाकरेही शर्यतीत उतरल्या की काय याची चर्चा सुरू झाली आहे.
काय म्हणाले सत्तार?
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच राहावेत अशी विनंती सर्वांनी केली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे मुख्यमंत्री कधी मुख्यमंत्री होतील, कोणत्या परिस्थितीत होतील याबाबत मी आता काहीही भाष्य करणार नाही. पण त्यांच्या नावाची जर मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असेल तर आमच्या रश्मीताई देखील सज्ज आहेत. त्यांचाही राजकारणाचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे हे पद सांभाळण्यास त्या सक्षम असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.
याआधीही केला होता उल्लेख
आमदार अब्दुल सत्तार यांनी याआधीही रश्मी ठाकरे यांचे नाव राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी घेतले होते. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठीच्या दुखण्यामुळे मंत्रालयात हजेरी लावता येत नव्हती. त्यावेळीही रश्मी ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात, असे विधान सत्तार यांनी केले होते.
Rashmi Thackeray ready for CM post; Statement of Shiv Sena Minister
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची 8 वर्षे : सरकारची भलामण; विरोधकांचे शरसंधान… पण जनतेच्या मनात नेमके काय??
- UPSC : महाराष्ट्रातील 60 हून अधिक विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश!!; महाराष्ट्र कन्यांची बाजी!!
- राज्यसभा निवडणूक : कोल्हापूरचा कोणता पैलवान जास्तीत जास्त अपक्षांना खेचणार??
- भारताशी संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तान घायकुतीला; ट्रॅक 2 डिप्लोमसीचा करावा लागतोय वापर!!
- कन्याशक्तीची युपीएससीत बाजी : श्रुती शर्मा देशात पहिली; टॉप 10 मध्ये 4 मुलींनी मारली बाजी; महाराष्ट्रातून प्रियंवदा म्हाडदळकर 15 वी
- राकेश टिकैत यांच्यावर काळी शाई फेकली; टिकैत यांचा भाजप सरकारवर आरोप!!