शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती एसीसीकडून मंजूर करण्यात आली होती.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात महाविकास आघाडीच्या सरकारने वादग्रस्त ठरविलेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरील मुंबई व पुण्यात दाखल असलेले सर्व गुन्हे उच्च न्यायालयाने रद्द ठरवले. शिवाय सायबर पोलसी ठाण्यातही त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास बंद करण्यात आला होता. त्यानंतर शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी बढती एसीसीकडून मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार आता त्यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. Rashmi Shukla appointed as Director General of Police of Maharashtra
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे , आमदार व तत्कालीन मंत्री बच्चू कडू, संजय काकडे, आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याचे रश्मी शुक्लांवर आरोप करण्यात आले होते.
१९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी असलेल्या ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बेकायदेशीररित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तत्कालीन सरकारने याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या विरोधात कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौकशीसाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यान, त्यांची चौकशी सुरू असताना त्यांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे केंद्रीय राखीव दलाच्या प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती.
Rashmi Shukla appointed as Director General of Police of Maharashtra
महत्वाच्या बातम्या
- पवारांना राहुलमध्ये होताहेत देशाच्या नेतृत्वाचे भास; कारण महाराष्ट्रात ते लावून बसलेत सुप्रियांच्या नेतृत्वाची आस!!
- Bihar Caste Survey : “जात जनगणनेची आकडेवारी पूर्णपणे खोटी, माझ्या घरापर्यंत कोणीही पोहोचले नाही”
- टीव्ही-कॉम्प्युटर स्क्रीनला एलईडी तंत्रज्ञान प्रदान करणाऱ्या शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक
- LCA Tejas : हवाई दलाला मिळाले पहिले ‘LCA Tejas’ विमान; जाणून घ्या, खास वैशिष्ट्ये