• Download App
    चित्रपट, मालिकेत काम देण्याच्या आमिषाने नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार|Rape on the actress with the lure of working in the film,

    चित्रपट, मालिकेत काम देण्याच्या आमिषाने नवोदित अभिनेत्रीवर बलात्कार

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : चित्रपट व मालिकांमध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवत नवोदित अभिनेत्रीवर पुण्यात बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे.Rape on the actress with the lure of working in the film,

    समीर बाळू निकम असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर निकम हा युट्युब वर गाणी आणि शॉर्ट फिल्म बनवतो.



    आरोपीने 31 वर्षीय पीडित महिलेला चित्रपटात काम मिळवून देतो असे आमिष दाखवले होते. तिला गोड बोलून सलग दोन वर्षापासून तिच्यासोबत त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते.

    तसेच या महिलेच्या पतीला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच या महिलेला मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक खेतमाळस करीत आहेत.

    Rape on the actress with the lure of working in the film,

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bihar Maha : महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; 20 महिन्यांत प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा

    Jain Muni : जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात मूळ चूक ट्रस्टींकडूनच, त्यांनी पापांचे प्रायश्चित्त घ्यावे; जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांची भूमिका

    मुंबई क्लायमेट वीक मध्ये होणार जागतिक वातावरण बदलावर विचार मंथन; इंडियन मेरीटाइम वीक मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा