t series managing director bhushan kumar : जगप्रसिद्ध म्युझिक कंपनी टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांच्याविरुद्ध हा गुन्हा मुंबईच्या डीएन नगर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांनी टी-सिरीजच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. rape case filed against t series managing director bhushan kumar in Mumbai
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जगप्रसिद्ध म्युझिक कंपनी टी-सिरीजचे मॅनेजिंग डायरेक्टर भूषण कुमार यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांच्याविरुद्ध हा गुन्हा मुंबईच्या डीएन नगर पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. भूषण कुमार यांनी टी-सिरीजच्या प्रोजेक्टमध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका 30 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. डीएन नगर पोलिसांनी भूषण कुमारविरोधात भादंवि कलम 376, 420, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
काम देण्याच्या नावाखाली या महिलेवर 2017 ते ऑगस्ट 2020 पर्यंत अत्याचार करण्यात आले. तिच्यावर तीन वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्ही गुन्हा नोंदविला आहे आणि आता त्याचा तपास करीत आहोत. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, 3 वर्षांपासून भूषण कुमारने प्रोजेक्टमध्ये काम देण्याच्या नावाखाली मला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माझ्यावर बलात्कार केला. तसेच मी कोणास सांगितले तर बरेवाईट होण्याची धमकीही दिली. पोलीस गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. लवकरच भूषण कुमार यांचा जबाबही नोंदवला जाईल. सध्या भूषण कुमार मुंबईत नाहीत.
पीडित तरुणीने असाही आरोप केला आहे की, भूषण कुमारने तिचा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याचीही धमकी दिली होती. दरम्यान, भूषण कुमार यांच्यावर अशा प्रकारचे आरोप लागण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याच्या आधी मीटू आंदोलनाच्या माध्यमातून मॉडल मरिना कुंवरनेही भूषण कुमार यांच्यावर शीरीरिक शोषणाचा आरोप केला होता.
rape case filed against t series managing director bhushan kumar in Mumbai
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra SSC Result 2021 : परीक्षेविना जाहीर झालेला राज्याचा १०वीचा निकाल ९९.९५%; कोकण विभाग १००%, तर नागपूरचा सर्वात कमी
- पर्यटनासाठी जंगलात गेलेल्या तरुणांना लुटले; बुलढाणा जिल्ह्यात १२ तासांत आरोपी जेरबंद
- आता चक्क रस्ताच वाजवेल हॉर्न
- भूकंपाचे असतात चार प्रकार
- जळगाव जिल्ह्यात नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह शेतकरी दांपत्य गेले वाहून ; महिला बचावली, पती बेपत्ता