विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raosaheb Danve भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना सांभाळवे नाहीतर ते आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात भांडण लाऊ शकतात, अशा शब्दात दानवे यांनी टीका केली आहे. संजय राऊत यांच्या मुळेच पक्षाची वाताहात झाली असून त्यांच्यामुळेच युती तुटली असल्याचे दानवे यांनी म्हंटले आहे.Raosaheb Danve
संजय राऊत यांनी धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर, ते आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत का, राजीनामा मागायला, असा खोचक सवाल उपस्थित केला. यावेळी बोलताना दानवे यांनी ईव्हीएमबाबत भाष्य करत विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले, त्यांनी कर्नाटक आणि हरयाणा जिंकली. लोकसभेत आमची हार झाली त्यावर त्यांनी ऑब्जेक्शन घेतले नाही. आता विरोधकांकडून आपल्या पक्षातील कार्यकर्ते थोपवण्यासाठी ईव्हीएमवर दोष दिला जात असल्याची टीका दानवे यांनी केली आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्य पातळीवरील सर्वच पक्षांनी कधी कधी स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळं वरच्या सूचना जशा येतील तशा सूचना पाळणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बोलताना दानवे म्हणाले, संतोष देशमुख यांच्या हत्येचे मी समर्थन करत नाही. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सरकार करेल. प्रकरण आता सीबीआयकडे गेले आहे. या प्रकरणात दोषी असलेल्यांना पकडून सरकार त्यांना शिक्षा देईल याची मला खात्री असल्याचे दानवे म्हणाले.
दरम्यान, बीड येथे गुन्हेगारीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. यावर दानवे म्हणाले, जो एखाद्या भागाचे प्रतिनिधित्व करतो त्याला आपल्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे. बीडच्या मोर्चात जाण्यासाठी आम्ही कोणाला थांबवले नाही. सहभाग घेऊ नका म्हणून पक्षाचा काही असा आदेश नाही. या देशात घटना घडली की काही लोक राजकारण करतात. ही घटना गंभीर आहे, या घटनेत दोषी लोकांना योग्य शिक्षा झाली पाहिजे, असे मत दानवे यांनी व्यक्त केले आहे.
Raosaheb Danve’s Tola – Take care of Sanjay Raut; otherwise he will create a fight between Aditya and Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या
- Dr Manmohan Singh : नरसिंह राव शिष्य डॉ. मनमोहन सिंग कालवश; आर्थिक सुधारणांचा महान कार्यवाहक!!
- ISRO’s : अंतराळात पालक उगवण्याची तयारी; इस्रोचे स्पॅडेक्स पेशी घेऊन जाणार, 30 डिसेंबरला लाँचिंग
- Pakistani : पाकिस्तानी शस्त्रास्त्रांचा पाच राज्यांमधून ईशान्येकडे पुरवठा:सुगावा लागताच भारतीय तपास संस्था सतर्क
- Maken : माकन म्हणाले- केजरीवाल देशाचे फ्रॉड किंग:त्यांना फर्जीवाल म्हणणे योग्य; लोकसभेत आपसोबत युती ही आमची चूक होती