विशेष प्रतिनिधी
मुंबई : काळाच्या पोटात काय आहे, हे आता सांगण कठीण आहे. परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेवरून विरोधकांच्या पोटात दुखतंय. मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात राज ठाकरे बोललेत तर आघाडीमधील नेत्यांना चांगलं वाटतं, पण जर त्यांच्याविरोधात बोलले तर मात्र त्यांच्या पोटात दुखते, असा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केल आहे.Raosaheb Danve accuses opponents of stomach ache over Raj Thackeray’s role
दानवे यांनी राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली. या पार्श्वभूमीवर बोलताना दानवे म्हणाले, एखाद्याच्या कामामुळे त्याच्याबद्दलचं मत बदलू शकतं. मोदींवर टीका केल्यानंतर राज ठाकरेंना आघाडीतील नेत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. परंतु आज त्यांच्यावर टीका केली, तर ते नाव ठेवायला लागले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत पाच राज्यांपैकी चार राज्ये आम्ही जिंकली, त्याचं कौतुक फक्त राज ठाकरेंनी केलं. चांगल्या कामाचं कौतुक नको का करायला?
राज ठाकरेंनी त्यांचं परप्रांतीयांबद्दलचं धोरण बदलल्यास भाजपा-मनसे युती होणार ही शक्यता नाकारता येत नाही. कारण जेव्हा वेगळ्या विचारधारेचे राजकीय पक्ष सोबत येतात, तेव्हा काही तडजोडी कराव्या लागतात आणि काही मुद्दे सोडून द्यावे लागतात, असेही दानवे यांनी सांगितले.
राज यांच्यासोबत भेटीबाबत बोलताना ते म्हणाले मुंबईत रेल्वेच्या जागेवर काही झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या हटवण्याची नोटीस सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर देण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व राजकीय पक्षांनी या झोपडपट्ट्या हटवण्याची मागणी केली होती. यानंतर मी सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या बैठकीत या झोपडपट्ट्या हटवू नये, असं म्हटलंय. तर, या झोपड्या हटवण्याच्या विषयासंदर्भात मी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्याच प्रमाणे मी राज ठाकरेंची भेट घेतली.
Raosaheb Danve accuses opponents of stomach ache over Raj Thackeray’s role
महत्त्वाच्या बातम्या
- पवार मुख्यमंत्री असते तर…!!; काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूरांचा शिवसेना – काँग्रेसखाली राजकीय सुरुंग!!
- शहाबाज शरीफ : 5 बायकांचा दादला; इम्रानला नाही ऐकला!!
- सिल्वर ओक वरील दगड – चप्पल फेक; १०९ एसटी कामगारांना नोकरी गमावण्याची “शिक्षा”!!
- समाजवादी पार्टी मुस्लिमांसाठी काम करत नाही खासदार बारक यांचा आरोप