• Download App
    पोलीस उपायुक्तासह दोन पोलीस निरिक्षकांवर खंडणीचा गुन्हा, फसवणुकीच्या गुन्ह्यात वाचविण्यासाठी मागितली १७ लाख रुपयांची खंडणी|Ransom demand of Rs 17 lakh, crime registered against three police officers, including Deputy Commissioner of Police and two police inspectors

    पोलीस उपायुक्तासह दोन पोलीस निरिक्षकांवर खंडणीचा गुन्हा, फसवणुकीच्या गुन्ह्यात वाचविण्यासाठी मागितली १७ लाख रुपयांची खंडणी

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : फसवणुकीच्या गुन्ह्यातून वाचविण्यासाठी प्रॉपर्टी डिलरकडून १७ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबईतील पोलीस उपायुक्तासह दोघा पोलीस निरिक्षकांसह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरिक्षक चिमाजी आढाव आणि सुनील माने अशी त्यांची नावे आहेत.Ransom demand of Rs 17 lakh, crime registered against three police officers, including Deputy Commissioner of Police and two police inspectors

    याप्रकरणी गुरूशरणसिंग चौव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. चौव्हाण यांचा प्रॉफर्टी डिलींग आणि फायनान्सचा व्यवसाय आहे. त्यांच्यावर फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल करण्याची धमकी या तिघांकडून दिली जात होती. एका खबऱ्याकडून चौव्हाण यांच्याकडून १७ लाख रुपयांची खंडणी तिघांनी घेतली.



    मात्र, त्यानंतर आणखी पैशाची मागणी सुरू केली. चौव्हाण यांनी त्यास नकार दिला असता त्यांना फसवणुकीच्या गुन्ह्यात गोवण्यात आले. त्यांना तिघांनी मारहाणही केली. त्याचबरोबर कोऱ्या कागदावर सह्या घेत जीवे मारण्याचीही धमकी दिली. हा सगळा प्रकार असह्य झाल्याने शेवटी चौव्हाण यांनी तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. कांदिवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Ransom demand of Rs 17 lakh, crime registered against three police officers, including Deputy Commissioner of Police and two police inspectors

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!