• Download App
    “द विक”ची माफी मान्य, पण प्रकरण कोर्टात आहे; निरंजन टकलेंच्या कोर्टातल्या अधिकृत भूमिकेनंतर बोलता येईल; रणजित सावरकरांची प्रतिक्रिया।Ranjit savarkar reaction on the week apology

    “द विक”ची माफी मान्य, पण प्रकरण कोर्टात आहे; निरंजन टकलेंच्या कोर्टातल्या अधिकृत भूमिकेनंतर बोलता येईल; रणजित सावरकरांची प्रतिक्रिया

    विनायक ढेरे

    नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची बदनामी करणारा लेख २०१६ मध्ये प्रसिद्ध करणाऱ्या “द विक” साप्ताहिकाने माफी मागितली आहे. ही माफी आम्हाला मान्य आहे अशी प्रतिक्रिया स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुतणे रणजित सावरकर यांनी द फोकस इंडियाशी बोलताना व्यक्त केली. Ranjit savarkar reaction on the week apology

    सावरकरांविषयी “द विक”ला अतिशय आदर आहे. आम्ही छापलेल्या लेखामुळे जर कोणी दुखावले गेले असेल, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, अशी चौकट “द विक”ने प्रसिध्द केली आहे असे रणजित सावरकर यांनी स्पष्ट केले.


    सावरकरांची यथेच्छ बदनामी करणाऱ्या ‘द विक’चा माफीनामा; सावरकरांबद्दल नितांत आदर असल्याचे जाहीर निवेदन! पण लेखक निरंजन टकले मात्र माफीसाठी राजी नाहीत


    मात्र “द विक”मधील संबंधित लेखाचे लेखक – पत्रकार निरंजन टकले हे लेखातील मतांवर ठाम आहेत आणि माफी मागण्यास राजी नाहीत, याबद्दल विचारले असता, रणजित सावरकर म्हणाले, की टकले यांच्या वृत्तपत्रातल्या निवेदनाला बोलण्यात काही अर्थ नाही. त्यांना आम्ही याचिकेत आरोपी केलेच आहे. ते सध्या जामिनावर आहेत. ते स्वतः अथवा त्यांचे वकील कोर्टात नेमकी काय भूमिका मांडतात ते बघवे लागेल. कोर्टाची कायदेशीर कारवाई तर सुरूच आहे, असे रणजित सावरकर यांनी स्पष्ट केले.

    Ranjit savarkar reaction on the week apology

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!