विनायक ढेरे
नाशिक : आज दिवसभरात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे दोन राऊत संजय राऊत आणि विनायक राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची नुसतीच खडाखडी झाली. पण कोणीच एकमेकांविरुद्ध पुरावे न दिल्या मुळे बाळासाहेबांच्या पठ्ठ्यांमधली ही कुस्ती “बिन निकाली” ठरली…!!Rane vs. Two Rauts: Allegations against the accused; Wrestling “Bin Nikali” due to lack of evidence
मुंबई महापालिकेला फक्त नारायण राणे यांच्या बंगल्याचे मोजमाप करण्याचे काम उरले आहे, असा आरोप करत नारायण राणे यांनी आज सकाळी शिवसेनेवर जोरदार ठोकून काढले. मातोश्रीतलेच बांधकाम बेकायदा आहे. आधी त्यांना दंड ठोठावा, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. त्यानंतर त्यांनी एका पाठोपाठ आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यांच्या सगळ्यांच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. दिशा सालियनचा खून कसा झाला?,
त्यावेळी तेथे कोण हजर होते?, हे सगळे मला माहिती आहे असे ते म्हणाले. त्याबद्दल तुम्ही पुरावे देऊ शकाल का?, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर मी सीबीआयला आणि केंद्रीय तपास समस्यांना योग्यवेळी लेखी पुरावे देईन, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात त्यांनी कोणतेही पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले नाहीत.
नारायण राणे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर शिवसेनेचे रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. नारायण राणे यांच्यावर सिंधुदुर्गातल्या 7 खूनांचा खळबळजनक आरोप केला. यावेळी त्यांच्या समवेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर होत्या. विनायक राऊत यांनी देखील नारायण राणे यांच्यावर विविध शाब्दिक तोफा डागताना प्रत्यक्षात 7 खुनांचे पुरावे दिले नाहीत.
विनायक राऊत आणि किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद सुरू असताना संजय राऊत तिथे आले. त्यांनी देखील नारायण राणे यांच्यावर जोरदार आगपाखड करून घेतली. त्याच वेळी संजय राऊत यांनी पालघर मध्ये ईडीच्या कोणत्या अधिकार्याची कोट्यवधींची गुंतवणूक आहे?, असा सवाल करत पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा गौप्यस्फोट करू, असा इशारा दिला.
पण हा इशारा देताना संजय राऊत यांनी तीनच दिवसांपूर्वी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण भाजपच्या नेत्यांची साडेतीन नावे सांगितलीच नाहीत, हे विसरून गेले. आता ते नवा गौप्यस्फोट करणार आहेत. पण यावेळी देखील संजय राऊत यांनी आपल्या आरोपाच्या पुष्टी दाखल कोणतेही पुरावे दिले नाहीत.
एकूण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुत्रासाठी त्यांच्यात पठ्ठ्यांमध्ये रंगलेल्या या कुस्तीमध्ये नुसतीच खडाखडी सुरू आहे आणि पुराव्यांअभावी कुस्ती “बिन निकाली” ठरताना दिसत आहे…!!
Rane vs. Two Rauts: Allegations against the accused; Wrestling “Bin Nikali” due to lack of evidence
महत्त्वाच्या बातम्या
- हिंदुस्थान हे तुमचेही घर!!; अफगाण हिंदू – शीख समुदायाला पंतप्रधान मोदींचे आश्वासन!!; 7 लोक कल्याण मार्गावर केले स्वागत!!
- बायो-सीएनजी प्लांट ७५ मोठ्या शहरांमध्ये बांधणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
- शिवजयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘मराठा आरक्षण देण्यासाठी ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागेल!’
- Vaccination : भारताने ओलांडला 175 कोटी लसींच्या डोसचा ऐतिहासिक टप्पा, आरोग्यमंत्री म्हणाले – नवा भारत, नवा कीर्तिमान!