विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : “त्या” वेड्या माणसावर बोलून मी माझा वेळ का बरबाद करू??, अशा तिखट शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांना टोला हाणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारालाच झापले. . rane going to win elections one-sided, with a margin of around 3 lakh votes
रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रचार दौऱ्यात नारायण राणे यांनी ठिकठिकाणी मेळावे घेऊन जनतेला संबोधित केले. अनेक ठिकाणी त्यांनी पदयात्रा केल्या कुडाळ, मालवण सारख्या भागांमध्ये रोड शो केले. या दौऱ्यात एएनआय या वृत्तसंस्थेचा पत्रकार सहभागी झाला होता. या वृत्तसंस्थेला नारायण राणेंनी एका ठिकाणी प्रतिक्रिया दिली.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपल्याला कसा प्रतिसाद मिळतो आहे. या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले, तो प्रतिसाद तर तुम्ही पाहतच आहात. मी आधीच राज्यसभेचा खासदार आहेच. शिवाय केंद्रात मंत्री आहे. कुठल्याही सभागृहाचा सदस्य असेल तर तो मंत्री राहतोच ना?? त्यामुळे मी पुढची 10 वर्षे कुठे जात नाही. आपण किती मतांनी निवडून याल??, असा प्रश्न विचारल्यावर नारायण राणे म्हणाले लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता मी 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईन. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेची निवडणूक एकतर्फी होईल.
मात्र, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेसंदर्भात प्रश्न विचारताच नारायण राणे उसळले. ते म्हणाले, आज माझ्या भाषणात जे बोललो ते तुम्हाला मी कव्हर करायला सांगितले होते. तेच तुम्ही सगळ्यांना सांगा. त्या वेड्या माणसावर जास्त बोलून मी माझा वेळ का बरबाद करू??, तुमच्याकडे दुसरा प्रश्न विचारायला नाही का??, इथे स्थानिक प्रश्न अनेक आहेत. पाण्याचा प्रश्न आहे. पावसाळ्यात इथे छोट्या नद्यांना पूर येतो त्याचा प्रश्न आहे. युवकांच्या रोजगाराचा – नोकऱ्यांचा प्रश्न आहे. येत्या वर्षभरात आम्ही हे सगळे प्रश्न सोडवू, असे सांगून नारायण राणे तिथून निघून गेले.
rane going to win elections one-sided, with a margin of around 3 lakh votes
महत्वाच्या बातम्या
- IMF कडून पाकला 9 हजार कोटी रुपयांची मदत; भारताने तिसऱ्या हफ्त्याच्या बाजूने मतदान केले नाही
- ठाकरे आणि पवार त्यांच्या मुलांसाठीच फिरत असल्याची कबुली देत ठाकरेंची मोदींवर वखवखलेल्या आत्म्याची टीका!!
- मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा झटका, सहावेळा आमदार झालेले रामनिवास रावत यांचा भाजपमध्ये प्रवेश!
- “… पण असे असूनही दक्षिणेत भाजपच्या जागा वाढतील” ; राजीव चंद्रशेखर यांचे विधान!