विशेष प्रतिनिधी
पुणे : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणदीप हुड्डाने काही वेळापूर्वीच आपली प्रेयसी लिन लैशरामशी लग्न केलं आहे. पारंपरिक मणिपुरी पद्धतीने या दोघांनी लग्नगाठ बांधली आणि हे दोघंही आता पती-पत्नी झाले आहेत. रणदीप हुड्डाने दोन दिवसांपूर्वी काही फोटो पोस्ट केले होते. ज्यानंतर तो आणि लिन लवकरच लग्न करणार आहेत हे स्पष्ट झालं होतं. मात्र लिन लैशराम कोण आहे तुम्हाला माहीत आहे का? आपण जाणून घेऊ तिच्याविषयी. Randeep Hooda marriage!
लिन लैशराम ही मणिपूरची एक प्रसिद्ध मॉडेल आहे. तसंच ती एक अभिनेत्रीही आहे. लिनने बॉलिवूडमधल्या काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सध्या लिन Shampoo Sana नावाचा एक ज्वेलरी ब्रांड चालवते. लिन आणि रणदीप या दोघांमध्ये दहा वर्षांचं अंतर आहे.
लिन लैशरामने प्रियंका चोप्राच्या ‘मेरी कोम’, करीनाच्या ‘जाने जाँ’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच ‘रंगून’, कैदी बंदी, ‘मटरु की बिजली का मन डोला’ या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. तसंच २०१२ मध्ये तिने एक रिअॅलिटी शोदेखील केला होता. कॅलेंडर गर्ल असं त्या शोचं नाव होतं. रणदीप आणि लिन या दोघांचे प्री वेडिंग फोटो व्हायरल झाले. या फोटोंमध्ये ते दोघंही आपल्या मित्र-मैत्रिणींसह धमाल मस्ती करताना दिसत आहेत.लिन लैशराम आणि रणदीप हु्ड्डा हे एकमेकांना दीर्घ काळापासून डेट करत आहेत. आधी त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता या दोघांनीही एकमेकांना आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं आहे
Randeep Hooda marriage!
महत्वाच्या बातम्या
- Madhya Pradesh Exit Poll : मध्य प्रदेशात कोणाचे सरकार? भाजपची कायम राहणार सत्ता! पाहा महानिकालाचा अंदाज
- Rajasthan Exit Poll : राजस्थानात भाजपची सत्ता, जवळपास सर्वच पोलमध्ये काँग्रेसची निराशा
- आता ‘या’ राज्यात पेपरफुटीप्रकरणी जन्मठेप आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंड!
- म्यानमारमधून मिझोराममध्ये पळून आलेल्या आणखी 30 सैनिकांना मायदेशी परत पाठवले