विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक रमेश देव ( (30 जानेवारी 1929- 2 फेब्रुवारी 2022) यांचे निधन झाले. गुरुवारी दुपारी अडीच वाजता पारसी वाडा, विलेपार्ले पूर्व येथे रमेश देव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. Ramesh Dev’s body will cremated at 2.30 pmImpression over Bollywood in more than 60 years
सकाळी साडेदहा ते एक/दीड वाजेपर्यंत रुपरंग सोसायटी, जुहू वर्सोवा लिंक रोड येथे रमेश देव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.हृदयविकाराच्या झटक्यामुळे मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांच्या मागे पत्नी,अभिनेत्री सीमा देव पुत्र आणि अभिनेता अजिंक्य देव, दिग्दर्शक अभिनय देव तसेच नातवंडे आर्य देव, तान्या देव असा परिवार आहे.
60 वर्षांपेक्षा दीर्घ फिल्मी करियर असलेल्या रमेश देव यांनी अनेक बड्या अभिनेत्यांसोबत काम केले. अभिनयाच्या बळावर मराठी चित्रपट ते बॉलीवूड पर्यंत प्रवास केला. सोने पर सुहागा, आजाद देश के गुलाम, कुदरत का कानून, इलजाम, पत्थर दिल, हम नौजवान, कर्मयुद्ध, मैं आवारा हूं, आखिरी दांव, प्रेम नगर, कोरा कागज, आनंद, आरती, मेरे अपने, आपकी कसम अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी चरित्र अभिनेता म्हणून काम केले.
रमेश देव यांचा जन्म अमरावती येथे झाला. पाच दिवसांपूर्वीच रमेश देव यांनी आपला 93 वा वाढदिवस साजरा केला होता. रमेश देव यांचे बालपण कोल्हापुरात गेले. रमेश देव यांचे वडील ठाकूरदेव त्या काळचे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. राजर्षी शाहू महाराजांमुळे त्यांचे आडनाव देव झाले. कलानगरी कोल्हापूर मध्ये वाढलेल्या, रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेल्या रमेश देव यांना नाटक,चित्रपट यांच्यात खूप आवड तरुणपणी होती.
1951 मध्ये ‘पाटलाची पोर’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजा परांजपे दिग्दर्शित ‘आंधळा मारतो एक डोळा’ या 1956 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे त्यांना ओळख मिळाली होती. राजश्री प्रॉडक्शनचा ‘आरती’ हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट. नंतर रमेश देव व सीमा (नलिनी सराफ) या दोघांचीही रूपेरी कारकीर्द सुरू झाली. ‘आलिया भोगासी’ चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची सीमा यांच्याशी पहिली भेट झाली आणि त्यानंतर सहा वर्षांनी एक जुलै 1953 मध्ये त्यांचा विवाह झाला.
रमेश देव चित्रपट आणि टेलिव्हिजन अभिनेता होते. ज्यांनी त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत 285 हून अधिक हिंदी चित्रपट, 190 मराठी चित्रपट आणि 30 मराठी नाटकांमध्ये काम केले. त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि 250 हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. ‘ आनंद ‘ या राजेश खन्ना यांच्या गाजलेल्या चित्रपटात रमेश व सीमा देव या जोडप्याने सहृदय पती पत्नीची समरसून भुमिका केली होती. ‘या सुखा़ंनो या’ या नावाने रमेश देव यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले होते.
रमेश देव यांचे चित्रपट : देवघर, भिंगरी, भैरवी, आधी कळस मग पाया, बाप माझा ब्रम्हचारी, एक धागा सुखाचा, क्षण आला भाग्याचा, प्रेम आंधळ असतं, सोनियाची पाऊले, आंधळा मागतो एक डोळा, येरे माझ्या मागल्या, आलिया भोगासी, आई मला क्षमा कर, राम राम पाव्हणं, अवघाची संसार, पसंत आहे मुलगी, यंदा कर्तव्य आहे, सात जन्माचे सोबती, जगाच्या पाठीवर, आलय दर्याला तुफान, दोस्त असावा असा.
Ramesh Dev’s body will cremated at 2.30 pmImpression over Bollywood in more than 60 years
महत्त्वाच्या बातम्या
- आशादायी, भारताच्या बेरोजगारारीत मोठी घट, सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा अहवाल
- जाणून घ्या क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल करन्सीमधील फरक
- राजस्थानच्या महसूल मंत्र्यांना सेक्स स्कॅँडलमध्ये फसविण्याचा डाव, मॉडेलला रिपोर्टर बनवून पाठविले
- खासदार कमलेश पासवान यांनी लोकसभेतच राहूल गांधींना सुनावले, म्हणाले तुमच्या पक्षाची आमच्यासाठी काही करण्याची लायकीच नाही