वृत्तसंस्था
मुंबई : शिवसेना नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना अखेर ईडीने अटक केली. दापोलीमधील कथित साई रिसॉर्टप्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. सदानंद कदम यांना घेऊन ईडीचे पथक मुंबईकडे रवाना झाल्याचीही माहिती मिळत आहे. Madas Kadam’s brother Dananda Kadam arrested by ED
उद्योजक सदानंद कदम हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचे लहान बंधू आहेत. त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्यांना ताब्यात घेतले असून ईडीचे पथक त्यांना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहे. रत्नागिरीतील खेडमधील कुडोशी येथील सदानंद कदमांच्याच अनिकेत फार्म हाऊस येथून त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. दापोली तालुक्यातील मुरुड येथील कथित साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीने कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.
सध्या दापोलीतील साई रिसॉर्टची सध्या मालकी सदानंद कदम यांच्याकडे आहे. सदानंद कदम हे ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांचे सख्खे लहान भाऊ आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्यावर सातत्याने आरोप केले होते. याच साई रिसॉर्ट प्रकरणी सोमय्यांकडून सदानंद कदमांचेही नाव जोडण्यात आले होते.
Ramdas Kadam’s brother sadananda Kadam arrested by ED
महत्वाच्या बातम्या
- Excise case : मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, ‘ईडी’ने मागितली दहा दिवसांची कोठडी!
- खतासाठी जात मुद्द्यावरून विरोधकांचा गोंधळ; पण मूळात जात विचारलीच नाही; कृषी विभागाचे प्रत्युत्तर!!
- “तू झुठी मैं मक्कार” या सिनेमामुळे मीडियामध्ये परस्परविरोधी मते..
- … आणि हो, घरगड्याला ‘गाजराचा हलवा’ वाटने साहजिकच आहे’’ उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर!