उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी मारल्या आहेत.Ramdas Athavale’s shocking statement; Said – Ajit Pawar will not be much affected by these raids
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या निकटवर्तीयांच्या कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी मारल्या आहेत. या धाडसत्रावर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठं विधान केलं आहे. या छाप्यांनी अजित पवार यांना फारसा फरक पडणार नाही, असं धक्कादायक विधान रामदास आठवले यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
रामदास आठवले यांच्या हस्ते एका कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे.ईडी, सीबीआय आणि इतर काही संस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्या तरी अजित पवार यांच्या कुटुंबियांवर पडलेल्या छापेमारीमध्ये केंद्र सरकारचा किंवा भाजपचा कसलाही हस्तक्षेप नाही. या यंत्रणा स्वतंत्र असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले. पण त्याच वेळी या छाप्यांनी अजित पवार यांना फारसा फरक पडणार नाही, असं धक्कादायक विधानही त्यांनी केले आहे.
या यंत्रणांनी 5 दिवस छापेमारी करण्याऐवजी कारवाई लवकर करावी, असं मतही त्यांनी व्यक्त केले. आर्यन खानवर NCB ने केलेली कारवाई योग्य असून नवाब मलिक यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केले. फिल्म इंडस्ट्रीमध्येच जास्त ड्रग्सचा वापर होतो असं सांगतानाच फिल्म इंडस्ट्री स्वच्छ असावी असंही ते म्हणाले.
उद्या 20 ऑक्टोबर रोजी रिपाइंचं आंदोलन
एक प्रभाग एक उमेदवार ही निवडणूक पद्धत योग्य असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्य सरकारने एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लागू करू नये. एक प्रभाग तीन सदस्य ही पद्धत लोकशाहीला घातक आहे. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य या संकल्पनेला छेद देणारी पद्धत आहे. त्यामुळे एक प्रभाग तीन सदस्य या पद्धतीला तीव्र विरोध करण्यात येईल.
राज्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची नुकसानभरपाई द्यावी, दलित अत्याचार रोखण्यासाठी अॅट्रोसिटी कायद्यातील तरतुदींची तंतोतंत अंमलाबाजवणी करावी, महिलांवरील अत्याचार रोखावेत अत्याचार पीडित महिलांना राज्य सरकारने 50 लाख रुपयांची मदत द्यावी, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी उद्या दि. 20 ऑक्टोबर रोजी राज्यात सर्व तहसील कचेरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करणार असल्याची घोषणा आठवले यांनी केली. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करताना कोरोना प्रसार होऊ नये याची दक्षता घेऊन मास्कचा वापर करीत नियमांचे पालन करून आंदोलन करण्याची सूचनाही त्यांनी केली.
Ramdas Athavale’s shocking statement; Said – Ajit Pawar will not be much affected by these raids
महत्त्वाच्या बातम्या
- WATCH : निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला नागपूरमधील घटना, जीवितहानी नाही
- IND vs PAK : भारताविरुद्ध पाकिस्तानच्या सामन्याची उत्कंठा, २४ ऑक्टोबरला खेळणारे ११ खेळाडू कोणते ?
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पकडण्यासाठी तपास यंत्रणांनी कंबर कसली; छापेमारीस सुरुवात
- WATCH : भरधाव कार चक्क हॉटेलमध्ये घुसली वर्धा जिल्ह्यातील घटनेमुळे नुकसान