प्रतिनिधी
नाशिक : नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज रामनवमी साजरी होत असून हा जन्म सोहळाही हजारो भाविक दरवर्षी अनुभवतात, त्यामुळे राम जन्म सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. 2 एप्रिल रोजी नाशिकची सुप्रसिद्ध राम रथाची मिरवणूक निघणार आहे.Ram Navami festival in kala ram mandir, ram rath miravnuk to be on 2 april
सकाळपासूनच मंदिरातील पुजार्यांकडून महाअभिषेक पूजन व इतर धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. मंदिराचा मुख्य भाग आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे, तर श्री राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींचीही सजावट करण्यात आली आहे. नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरातला हा जन्म सोहळाही हजारो भाविक दरवर्षी अनुभवतात, त्यामुळे राम जन्म सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. मंदिराचा मुख्य भाग आकर्षक फुलांनी सजवण्यात आला आहे, तर श्री राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्तींचीही सजावट करण्यात आली आहे.
राम नवरात्राच्या नऊ दिवसांमध्ये विविध ज्ञान सत्र, सांस्कृतिक कार्यक्रम यांची राम मंदिराच्या परिसरात रेलचेल होती. भाविकांनी मोठ्या उत्साहाने त्याचा लाभ घेतला. नाशिकच्या ऐतिहासिक सुप्रसिद्ध राम रथाची मिरवणूक 2 एप्रिल रोजी पंचवटीतील काळाराम मंदिरापासून निघणार असून ती नियमित मार्गाने नियोजित वेळेनुसार काळाराम मंदिरात परत येणार आहे. या राम रथाची परंपरा देखील सुमारे 250 वर्षांची आहे.
Ram Navami festival in kala ram mandir, ram rath miravnuk to be on 2 april
महत्वाच्या बातम्या
- Video : अमृतपाल सिंगने जारी केला व्हिडिओ , म्हणाला – ‘मला अटक करण्याचा हेतू असता तर…’
- राहुल गांधीचे लोकसभा सदस्यत्व रद्द प्रकरणावर नितीश कुमारांचे मौन; प्रशांत किशोर यांनी साधला निशाणा, म्हणाले
- iCloud : मोदी पायउतार झाल्यावर भाजपचे भ्रष्ट नेते तुरुंगात, केजरीवालांची दिल्ली विधानसभेत आगपाखड; पण नेमके “रहस्य” काय??
- महाविकास आघाडीच्या 11 सभा विरुद्ध 288 सावरकर गौरव यात्रा; शहास महाकाटशह!!