• Download App
    Raksha Khadse रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या ५ गुंडांविरोधात "पोक्सो" कायद्यांतर्गत गुन्हे दाखल; पोलिसांची कारवाई उशिरा, पण कठोरतेकडे!!

    Raksha Khadse रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या ५ गुंडांविरोधात “पोक्सो” कायद्यांतर्गत गुन्हे दाखल; पोलिसांची कारवाई उशिरा, पण कठोरतेकडे!!

    विशेष प्रतिनिधी

    जळगाव : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणाऱ्या ५ गुंडांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिसांनी अखेर “पोक्सो” कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. दोनच दिवसांपूर्वी रक्षा खडसे यांची मुलगी रिशिका तिच्या मैत्रिणींबरोबर मुक्ताईनगरच्या यात्रेत फिरायला गेली होती. तिथे भोई नावाच्या गुंडाने आपल्या साथीदारांसह येऊन रिशिका आणि तिच्या मैत्रिणींची छेड काढली. त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षारक्षकालाही धक्काबुक्की केली. पोलिसांनी त्या संदर्भात कारवाई करताच भोईने स्वतःची जामिनावर सुटका करून घेतली.

    पण रक्षा खडसे यांनी हे प्रकरण लावून धरले त्यांनी स्वतः रिशिका आणि अन्य मुलींसोबत पोलीस ठाण्यात जाऊन छेडछाडी विरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी भोई याच्यासह ५ गुंडांवर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. पियुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, सचिन पालवी अशी या गुंडांची नावे आहेत. या गुंडांनी गेल्याच महिन्यात मुक्ताई यात्रेतल्या फराळ वाटप कार्यक्रमाच्या वेळी देखील रिशिका आणि तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यावेळी त्यांनी त्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते.

    परंतु, आज रक्षा खडसे यांनी पुढाकार घेऊन या छेडखानी प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचे ठरविले. त्या स्वतः पोलीस ठाण्यात या मुलींना घेऊन पोचल्या तिथे त्यांनी पोलिसांना स्वतःचे पत्र दिले त्याचबरोबर मुलींनी संबंधित गुंडांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या गुंडांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले.

    Raksha Khadse’s daughter molested

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rajnath Singh : राजनाथ सिंह यांनी गायडेड-पिनाका रॉकेट प्रणालीला हिरवा झेंडा दाखवला; आर्मेनियालाही निर्यात होणार

    Power house Maharashtra : दावोस मध्ये पहिल्याच दिवशी १४ लाख ५० हजार कोटी गुंतवणूकींचे १९ सामंजस्य करार; महाराष्ट्रात १५ लाख रोजगार संधी!!

    फालतू बातम्यांच्या पुड्या सोडून मुंबईतल्या भाजपच्या महापौराला रोखता येणार आहे का??